शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

किल्ला पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:24 IST

१ मार्च २०१७ रोजी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली होती. या श्रमदानाला ६५० दिवस पूर्ण झाले. अभियानात सहभागी स्वयंसेवक ऐतिहासिक वैभव लक्षात घेऊन योगदान देत आहेत. किल्ला स्वच्छतेमुळे पर्यटक भेट देत आहेत.

ठळक मुद्देइको-प्रोचा उपक्रम : श्रमदानाला ६५० दिवस पूर्ण; स्वयंसेवक, विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १ मार्च २०१७ रोजी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली होती. या श्रमदानाला ६५० दिवस पूर्ण झाले. अभियानात सहभागी स्वयंसेवक ऐतिहासिक वैभव लक्षात घेऊन योगदान देत आहेत. किल्ला स्वच्छतेमुळे पर्यटक भेट देत आहेत.काही दिवसांपूर्वीच पांढरकवडा येथील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते. ‘मन की बात’ मधूनही उपक्रमाची दखल घेतली. इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ऊ न, वारा, पाऊ स थंडीची तमा न बाळगता रोज नियमित ६ ते ९ वाजेपर्यंत श्रमदान करून किल्ल्याची स्वच्छ करत आहेत.श्रमदानामधून मागील दोन वर्षात गोंडकालीन इतिहास, ऐतिहासिक वास्तुंची स्वच्छता झाली. इतिहास नव्याने समोर आला. चंद्रपूरकर हेरिटेज वॉक या इको-प्रोच्या उपक्रमातून शहरातील नागरिक ऐतिहासिक वास्तु पर्यटनाचा आनंद घेत आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी राष्टÑीय स्तरावर संदेश देता यावा, याकरिता शहरातील ऐतिहासिक ११ किमी लांब असलेला किल्ला व परकोट स्वच्छता अभियान सुरू केले. अभियानाला यशस्वी करण्यासाठी शहरातील विविध संस्था-व्यक्तींनी आवश्यक साहित्य पुरविले. किल्ला स्वच्छता अभियानामधील इको-प्रो सहकारी व श्रमदानाकरिता सहभागी झालेले महाविद्यालयीन विद्यार्थी, शहरातील नागरिक, युवक यांचेही सहकार्य लाभले. अभियानाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केल्याने हे काम पूर्ण होऊ शकले, अशी माहिती इको- प्रो संस्थाचे यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिली. किल्ला स्वच्छता अभियानामून दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूकडे पुरातत्व विभागाने लक्ष वेधण्यात इको-प्रोला यश प्राप्त झाले. आतापर्यंत शहरातील अनेक किल्ल्यांची स्वच्छता करण्यात आली सध्या रामाळा तलावाला लागून असलेली किल्ला भिंत आणि त्यामधून उगवलेली झाडेझुडपे काढण्याचे कठीण काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यास शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.