शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

दारुविक्री करताना माजी सैनिकाला अटक

By admin | Updated: April 24, 2017 01:03 IST

नांदाफाटा परिसरात दारूविक्रीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘दे बत्ती आंदोलन’ सुरुकरण्यातआले आहे.

युवक काँग्रेसचे स्टिंग आॅपरेशन : ‘दे बत्ती’ आंदोलनाचा पहिला दणकाआवारपूर : नांदाफाटा परिसरात दारूविक्रीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘दे बत्ती आंदोलन’ सुरुकरण्यातआले आहे. युवक काँग्रेसने स्टिंग आॅपरेशन करून अल्ट्राटेक वसाहतीतून दारूची तस्करी करणाऱ्या माजी सैनिकाला पकडण्यात पोलिसांना मदत केली. या कारवाईत पोलिसांनी विदेशी दारूच्या १७ बाटल्या दारु जप्त केल्या आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ८ वाजतादरम्यान करण्यात आली.संतोष गोकुल श्रीवास (४५) रा. अल्ट्राटेक वसाहत, आवारपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष हा माजी सैनिक असून अल्ट्राटेक येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सद्या तो सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. तोे माजी सैनिक असल्याने त्यांना काही प्रमाणात दारू बाळगण्याचा अधिकार आहे. याचाच फायदा घेत आरोपी संतोष नागपूरच्या सैनिक कँटिंगमधून दारू आणून ती विकत असल्याची माहिती युवक कॉंग्रेसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे युवक काँग्रेसचे राजुरा विधानसभा अध्यक्ष तथा बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी ती माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आरोपींच्या घरावर छापा टाकला. त्यात तब्बल १७ विदेशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. या सर्व बॉटल्सवर फक्त डिफेन्स सर्व्हिससाठी असे लिहिले होते. सदर कारवाई ठाणेदार विनोद रोकडे यांच्या मार्गदर्शनात सुनील बोरीकर, पुरुषोत्तम पंधरे, नारायण वाघमोडे, योगेश पिदूरकर, संदीप दुर्योधन आदि पोलिसांनी केली. आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, बिबी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र अल्ली, हरून सिद्दिकी, लोकनाथ कोडापे, सागर करावला आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)अल्ट्राटेकच्या बसमधून पोहोचते दारूसंतोषसाठी कंपनीच्या वस्तीत दारू पोहचविण्याचा सोपा मार्ग म्हणजे कंपनीची बस होय. अल्ट्राटेकच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या रोज तीन बस चंद्रपुरसाठी सोडण्यात येतात. संतोष नागपूरहून चंद्रपूरपर्यंत खाजगी बसमध्ये दारु घेऊन येतो. त्यानंतर चंद्रपूरहून अल्ट्राटेक आवारपूरसाठी कंपनीच्या बसने दारु नेत असतो. संतोष माजी सैनिक असल्याने त्यांच्यावर कोणालाही शंका येत नव्हती.आंदोलनकर्त्यांना दारूविक्रेत्यांकडून धमक्यादारूविक्री बंद होऊन आपली अवैध आय बंद होईल म्हणून नांदाफाटा परिसरातील दारूविक्रेते चिडले आहेत. त्यामुळे ते दारूविक्रेत्यांच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. दारूबंदीसाठी नागरिकांचा सहभाग वाढल्यास १०० टक्के दारुबंदी होणे शक्य आहे. ठिकठिकाणी नागरिकांनी अशाप्रकारे सहभाग द्यावा, जेणेकरून दारूविक्रेत्यांची दारू विकण्याची हिंमत होणार नाही.- विनोद रोकडे, ठाणेदार गडचांदूर‘दे बत्ती’ आंदोलनाचा हा पहिला दणका असून पहिल्याच दिवशी दारु विक्रेत्याला पकडण्यात आले आहे. कोणाच्याही अंगावर हात टाकून युवक काँग्रेस कायदा हातात घेणार नाही. तर पोलिसांच्या मदतीने नांदाफाटा, बिबी, आवारपूर येथील दारू पूर्णपणे बंद करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.- आशिष देरकर, अध्यक्ष,राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेस.