शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

तलाव खोलीकरणाचा विसर

By admin | Updated: April 27, 2015 00:54 IST

सध्या संपूर्ण देशातच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविण्यासाठी शासनदरबारी विचार केला जात आहे.

लोकमत विशेषरवी जवळे चंद्रपूरसध्या संपूर्ण देशातच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविण्यासाठी शासनदरबारी विचार केला जात आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न राज्यभरात जोरदार सुरू आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. तलाव आणि विहिरींना ग्रामीण भागातील मुख्य जलस्रोत म्हटले जाते. मात्र गतकाळात डोकावून बघितले तर या जलस्रोतांविषयी प्रशासन आणि पर्यायाने शासनाला काही देणेघणे असावे, असे वाटत नाही. तलावात वर्षानुवर्षांपासून साचलेला गाळ काढून तलावाचे खोलीकरण करण्याचा प्रशासनाला विसरच पडला आहे. गावागावांतील विहिरींचीही अशीच दैना आहे. त्यामुळे या जलस्रोतांची साठवण क्षमताच कमालीची कमी झाली आहे. परिणामी दरवर्षी पाणी टंचाईच्या भर पडत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळा कमालीचा तापतो, हे सर्वांना ठाऊक आहे. मे महिना आला की जिल्ह्यातील जलस्रोट आटतात. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील भलेमोठ्या सिंचन प्रकल्पातील जलसाठाही ड्राय होतो. असा अनुभव आजवर अनेकदा आला आहे. अशावेळी ग्रामीण भागातील पाण्याची पातळीदेखील कमालीची खालावते. विहिरी, तलावांमध्ये पाणीसाठा नसतो. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात सिंचन तर सोडाच; प्यायलाही पाणी मिळत नाही. वणवण भटकंती करावी लागते. जिवती, कोरपनासारख्या तालुक्यात तर पाण्याचे दुर्भिक्ष एवढे भयाण असते की चक्क डबक्यातील पाणी काढून नागरिकांना प्यावे लागते. जिल्ह्यात सुमारे मध्यम, लघू व मामा तलावांची संख्या सोळाशेहून अधिक आहे. हे तलाव साधरणत: गावाशेजारी असल्यामुळे ग्रामीण भागात या तलावांना मोठे महत्व असते. महत्त्वाचे जलस्रोत म्हणूनच या तलावांकडे बघितले जाते. या तलावांमुळे गावखेड्याची तहान भागते. शिवाय शेतकऱ्यांचे सिंचनही होते. या तलावांचा महत्वाचा फायदा असा की या तलावांमुळे गावातील पाण्याची पातळीही कायम असते. तलाव आटले की पाण्याच्या पातळीवरही परिणाम होतो. त्यामुळे बोअरवेल, विहिरी आपसुकच आटतात. जिल्ह्यातील तलावांची स्थिती सध्या दयनीय आहे. वरकरणी हे तलाव पाण्याने भरलेले दिसत असले तरी तलावांची पूर्वीची साठवण क्षमता आता राहिलेली नाही. या तलावात वर्षानुवर्षांपासून गाळ साचलेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या तलावात गाळ साचतो. मात्र तो काढला जात नाही. २०१२-१३ या वर्षात अतिवृष्टी झाली होती. तब्बल तीनवेळा पूर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी अनेक तलाव फुटले, क्षतीग्रस्त झाले. पाटबंधारे विभागाकडून याचे सर्वेक्षणही झाले. मात्र या तलावांची दुरुस्ती अद्यापही झाली नसल्याची माहिती आहे. याशिवाय जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतक्या तलावातील गाळ उपसला जातो. त्यामुळे तलावांची दैनावस्था होत आहे.