शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जबरान जोतधारकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:23 IST

शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली.

ठळक मुद्देब्रह्मपुरीत मागण्यांकडे वेधले लक्ष : शेकडो शेतमजूर, जबरोन जोतधारकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतमजूर व जबरान जोतधारकांना सामाजिक न्यायानुसार विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेकडो नागरिकांनी उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरूवात झाली. संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनीही मोर्चात सहभागी होवून सरकारविरूध्द घोषणाबाजी केली.ब्रह्मपुरी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जबरान जोतधारकांची संख्या हजारोंचा घरात आहे. हक्काची जमीन नसल्याने कुटुंब कसे जगवावे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. भारतीय संविधानाने सामाजिक न्यायाची तरतूद केली. याला अनुसरून शासनाने अनेक कायदे केले. परंतु हे कायदे कागदावरच असल्याने शेकडो जबरान जोतधारकांना जमिनीपासून वंचित राहावे लागत आहे.राज्य व केंद्र शासनाने विविध नियम तयार करून जबरान जोतधारकांना जमीन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. परंतु योजनेची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतमजूर व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांपासून हक्कापासून डावलल्या जात आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांमध्ये कायद्यानुसार लाभ मिळत नाही. यामुळे मोर्चेकऱ्यांनी सरकारविरूद्ध घोषणेबाजी केली. उपविभागीय अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व किसान सभेनी केले. यावेळी विनोद झोडगे, डॉ. महेश कोपूलवार, अरूण वनकर, देवराव चवळे, मिलिंद भन्नारे, नामदेव नखाते, दौलत खानखुरे, रामदास कामडी, धनराज खोब्रागडे आदीसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.२५ गावांना पाणी द्याब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी व अड्याळ तलाठी साजात येणाऱ्या २५ गावांना गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेती वाया जाते. निसर्गाच्या भरोशावर असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडेही नागभिड व ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांनी मोर्चाद्वारे लक्ष वेधले.