शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रानात चराई बंदी, गुरांचे पोट भरण्यासाठी चंद्रपुरात मुरघास उपक्रम

By साईनाथ कुचनकार | Updated: April 28, 2023 14:56 IST

चाराटंचाईवर होणार मात

चंद्रपूर : जनावरांना आता रानात चराई बंदी आहे. त्यामुळे जनावरांना घरच्या घरी चारापाणी द्यावे लागते. त्यामुळे पौष्टिक चारा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी दुग्ध उत्पादनावरही परिणाम होत आहे. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत असल्याने दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मक्यापासून मुरघास चारा बनविण्याच्या उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे चाराटंचाईवर मात करता येणार आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनात अजयपूर येथील विठ्ठल परसूटकर यांनी आपल्या शेतावर बाजरी लावली. यातून दोन टन मुरघास विशेष प्रशिक्षकाकडून तयार करून घेतले. या उपक्रमाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अजयपूर येथे भेट देऊन प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरवळकर उपस्थित होते.

मुरघास चारा दुधाळू जनावरांसाठी वरदान आहे. विशेषत: मक्यापासून बनविलेला मुरघास जनावरे मोठ्या चवीने खातात. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. मुरघास सहा रुपये किलो दराने विकल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो. मुरघास दिल्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईलच, तसेच शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होईल, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनासोबतच जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी पर्यवेक्षक बुगेवार व गावातील दूध उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीchandrapur-acचंद्रपूर