शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघावर वनविभागाचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 23:20 IST

या भागात अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक असल्याने शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. म्हणूनच वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी व शेतकरी वर्गाकडून केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन वनविभागाने हल्ला करणारा वाघ नेमका तोच आहे का, याची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे.

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : ढोरपा पाहार्णी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या त्या वाघावर वनविभागाने पाळत ठेवणे सुरू केले आहे. यासाठी अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून, मनुष्यबळाची गस्तही वाढविण्यात आली आहे.तीन दिवसांपूर्वी ढोरपा येथील सविता सोमेश्वर भुरले (५३) या शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने यावेळी शेतातच असलेला तिचा पती तिच्या मदतीला धावल्याने ती या हल्ल्यातून बचावली. मात्र, याच महिन्यात याच परिसरात मोडणाऱ्या पान्होळी आणि टेकरी येथेही वाघाच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला. या घटनांनी परिसरातील जनजीवन चांगलेच प्रभावित झाले आहे. एवढेच नाही, तर शेतकरी वर्गात दहशतही पसरली आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक असल्याने शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. म्हणूनच वनविभागाने या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी व शेतकरी वर्गाकडून केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन वनविभागाने हल्ला करणारा वाघ नेमका तोच आहे का, याची पडताळणी सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे. याशिवाय त्या परिसरात गस्तही वाढविली आहे. या गस्तीवर वनपरिक्षेत्राधिकारी हजारे हे  लक्ष ठेवून आहेत. गस्तीमध्ये राउंड ऑफिसर, वनरक्षक, वनमजूर आणि पीआरटी सदस्यांचा समावेश आहे. हे पथक हल्लेखोर वाघ नेमका तोच आहे का, याची पडताळणी करीत आहेत.

एक नाही, अनेक वाघएक नाही, तर एकापेक्षा अधिक वाघ आहेत, असे गावकरी सांगत आहेत. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे. हा परिसर उमरेड कऱ्हांडला या अभयारण्याजवळ आहे. येथील वाघ भ्रमंतीसाठी या परिसरात येत असावेत. आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ याची या परिसरात भ्रमंती असायची. जय जेव्हा बेपत्ता झाला होता, तेव्हा या परिसरात त्याचे लोकेशन घेण्यात येत होते. शिवाय याच जयचा बछडा म्हणून ओळखल्या जायचे. त्या श्रीनिवासन या वाघाची हत्या याच परिसरात झाली होती.

 

टॅग्स :Tigerवाघ