शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

२०७ मचानींसाठी वन विभागाकडे २५४ अर्ज प्राप्त

By admin | Updated: May 20, 2016 01:06 IST

येत्या २१ व २२ मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर, कोर क्षेत्रात पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाणार आहे.

२१ व २२ मे रोजी प्राणीगणना : लख्ख चंद्रप्रकाशात ताडोबात गणनाचंद्रपूर : येत्या २१ व २२ मे रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर, कोर क्षेत्रात पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाणार आहे. चंद्राच्या लख्ख प्रकाशात होणाऱ्या या प्राणी गणनेसाठी २५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून ४५६ प्रगणकांची निवड वनविभागाने केली आहे.दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना केली जाते. यंदा २१ आणि २२ मे रोजी ताडोबातील कोर आणि बफर क्षेत्रातील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांचे अस्तित्व संनियंत्रण कार्यक्रम राबविला जाणार आहे. प्राणी गणनेच्या अनुषंगाने अर्ज मागविण्यात आले होते.प्राणी गणनेसाठी कोर भागात ६८, तर बफर क्षेत्रात १३९ मचानी उभारण्यात येणार आहेत. मचानीवर प्राणी गणनेसाठी २५४ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ४५६ प्रगणक प्राप्त ठरले आहेत. बफर विभागात लोखंडी मचान, निरीक्षण मानोरा व स्थानिक कर्मचाऱ्यांमार्फत लाकडी मचानी तयार करण्यात आल्या आहेत. मचानीवर एक क्षेत्रीय कर्मचारी आणि दोन प्रगणक बसविण्यात येणार आहेत. प्रगणकांकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत नियमावली तयार करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)