शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गडबोरीत वनविभागाची गस्त; २० कर्मचारी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:38 IST

सिंदेवाही तालुक्यातील मौजा गडबोरी येथे रविवारी एका लहान बालकाला बिबट्याने घरातून पळवून ठार केले. या घटनेनंतर गावात बिबट्याची दहशत आहे. विशेष म्हणजे, नागरिक शेतशिवारात तसेच सायंकाळी गावाबाहेर जाण्यासही घाबरत आहे. दरम्यान, वनविभागाने २० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परिसरात गस्त सुरु केली असून गावाभोवती चार पिंजरे लावले आहे.

ठळक मुद्दे दहशत कायम : बिबट्याला पकडण्यासाठी जागोजागी लावले पिंजरे

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील मौजा गडबोरी येथे रविवारी एका लहान बालकाला बिबट्याने घरातून पळवून ठार केले. या घटनेनंतर गावात बिबट्याची दहशत आहे. विशेष म्हणजे, नागरिक शेतशिवारात तसेच सायंकाळी गावाबाहेर जाण्यासही घाबरत आहे. दरम्यान, वनविभागाने २० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परिसरात गस्त सुरु केली असून गावाभोवती चार पिंजरे लावले आहे.नरभक्षक बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाने घटनास्थळापासून परिसरात १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती नवरगाव क्षेत्र सहाय्यक बुले यांनी दिली.बालकाला पळवून नेल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावात एकच गर्दी उसळली होती. ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना माहिती होताच त्यांनी मृत स्वराजचे वडील सचिन गुरनुले यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यानंतर ३ जून रोजी माजी आमदार अतुल देशकर यांनी मृतक कुटुंबीयांची भेट घेत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दोन महिन्यात बिबट गावात सिरकाव करीत होता. त्यात गावातील ५० ते ६० शेळ्या फस्त केल्या. वारंवार गावकऱ्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. मात्र वनविभागाने कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. आजपर्यंत गावात येऊन गोठ्यातील शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. परंतु वनविभागाकडून अत्यल्प मोबदला दिल्या जात असल्याचेही यावेळी ग्रामस्थांनी त्यांना सांगितले. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशीही मृतक स्वराजच्या घराजवळ रात्री बिबट आला होता, अशी माहितीही काही ग्रामस्थांनी दिली. अजूनही गावकऱ्यांत बिबट्याची दहशत कायम आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे गावकºयांला कठीण झाले आहे. नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.तालुका दहशतमुक्त करण्याची मागणी

 

टॅग्स :leopardबिबट्या