शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
...मग प्रत्येक भारतीयावर ₹ 4,80,000 कर्ज कशाचे? RBI चा रिपोर्टवर काँग्रेसचे बोट, मोदी सरकारवर चढवला हल्ला
3
'त्या' शेतकरी, शेतमजुरांना १० लाखांची मदत द्या; काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी
4
वैजापूरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणात परप्रांतीय कनेक्शन, दोन आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
5
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
6
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
7
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
8
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
9
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
10
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
11
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
12
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
13
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
14
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
15
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
16
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
17
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
18
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
19
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
20
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट

परक्या मिरचीनेच दिला ‘त्यांना’ आधार

By admin | Updated: February 9, 2016 00:47 IST

मिरची भलेही नागभीड तालुक्यातील पीक नसेल पण याच मिरचीने या तालुक्यातील शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

हाताला मिळाले काम : मिरचीचा ठसकाही झाला आता गोड घनश्याम नवघडे नागभीडमिरची भलेही नागभीड तालुक्यातील पीक नसेल पण याच मिरचीने या तालुक्यातील शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. नागभीड तालुक्यातील बाम्हणी, कानपा आणि मोहाळी येथे भेट दिली तर याची प्रचिती येते.नागभीड तालुक्याचे मुख्य आणि एकमेव पीक धान आहे. या एका पिकावर तालुक्याची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. पण दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या तालुक्यातील धान शेती भकास होत चालली आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी या धोरणाने शेतकरीही हतबल झाले आहेत. उद्योगाच्या बाबतीतही नागभीड तालुका कोसो दूर मागे आहे. उद्योगाविरहीत तालुका अशीच नागभीडची ओळख आहे. त्यामुळे येथील तरुणांना आणि लोकांना बेकारीचेच जीवन जगावे लागत आहे. अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील बाम्हणी, मोहाळी आणि कानपा येथे सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मिरचीचे सातरे सुरु असून शेकडो मजूर त्या ठिकाणी कामाला जावून रोजगार प्राप्त करुन घेत आहेत. अशा परिस्थितीत नागभीड तालुक्यातील बाम्हणी, मोहाळी आणि कानपा येथे सुरु करण्यात आलेले मिरचीचे सातरे त्या परिसरातील मजुरांना दिलासा देणारे ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मिरचीचे सातरे सुरु असून शेकडो मजुर त्या ठिकाणी कामाला जावून रोजगार प्राप्त करुन घेत आहेत. येथील सातरे पाहून अनेकांना समज होत आहे की, ही मिरची एक तर भिवापूर येथून किंवा नागपूर जिल्ह्यातून येत असावी. पण हा समाज पूर्णत: चुकीचा आहे. या सातऱ्यावर येणारी मिरची आंध्रप्रदेशातून मिरची ट्रकाद्वारे आणल्या जाते. तिथे मिरचीच्या मुक्या काढल्या जातात. त्यासाठी एका बोऱ्यावर मजुरांना ५०० रुपये मोबदला दिला जातो. एक जोडी दीड दिवसात एक बोरा मिरचीच्या मुक्या काढण्याचे काम करते. आता हे सातरे गावातच सुरु झाल्याने या मजुरांनी मुलांनाही या कामावर लावून घेतले आहे. त्यामुळे या मजुरांना दरडोई १५० ते २०० एका दिवसाचा मोबदला मिळतो. मिरची स्वच्छ झाली की देशविदेशात निर्यात होते. शासनाने मग्रारोहयोच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचे कबुल केले असले तरी शासनाचे हे आश्वासन अभावानेच नागभीड तालुक्यात दिसून येतो. त्यामानाने या सातऱ्याच्या रुपाने मिळालेला रोजगार परिसरातील मजुरांना दिलासा देणारा आहे.आम्ही यापूर्वी दुसऱ्या गावातील सातऱ्यावर जाऊन काम करीत होतो. यात आमचा बराच वेळ जात होता. या वेळीची बचत व्हावी म्हणून कंत्राटदाराने आम्हाला आमच्या गावीच सातरा उपलब्ध करुन दिला, असे एका महिला मजुराने सांगितले.