शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

ग्रामीण रुग्णालयात वयाच्या दाखल्यासाठी पायपीट

By admin | Updated: April 17, 2017 00:44 IST

राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग विधवा, गरीब वृद्ध, अपंग, गंभीर आजारग्रस्तांना सन्मानाने जीवन जगता यावे ...

अधीक्षकाचा गलथान कारभार: निराधार वृद्धांची मोठी गैरसोयबल्लारपूर : राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग विधवा, गरीब वृद्ध, अपंग, गंभीर आजारग्रस्तांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून संजय गांधी निराधार योजना राबवित आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालयातून देण्यात येतो. परंतु येथील अधीक्षकांनी मनमर्जी धोरण ठरवून आठवड्यातून एकाच दिवशी दाखला देण्याचे फर्मान सोडल्याने वयाच्या दाखल्यासाठी लाभार्थ्यांची पायपीट होत आहे.परिणामी निराधारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधीक्षकांच्या गलथान कारभारामुळे त्यांची येथून बदली करण्याची मागणी दिव्यांग कल्याण समितीचे जिल्हा सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी केली आहे. गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शासनाकडून दिलासा मिळावा म्हणून सामाजिक न्याय विभाग लोकाभिमूख योजना राबवले. या योजनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना राबवून आर्थिक अनुदान देत आहे. यासाठी वयाचे प्रमाणपत्र जोडण्याची अट आहे. यावर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अधिकारी स्तरावरील स्वाक्षरी ग्राह्य धरली जात असून वयाचा दाखला आवश्यक बाब आहे. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांनी अशा दाखल्यासाठी स्वमर्जीने गुरुवारचा दिवस निश्चित केल्याने लाभार्थ्यांची अडचण वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दररोज दाखला देण्याचे क्रमप्राप्त असताना जाणीवपूर्वक गरजूना मानसिक व शारिरीक त्रास देण्याचे धोरण अवलंबिले असल्याचा आरोप श्रीनिवास सुंचूवार यांनी केला आहे. या संदर्भात सुंचूवार यांनी येथील वृद्धांची व निराधारांची ससेहोलपट थांबवावी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याकडे निवेदन सादर करुन उपाय योजना करण्याची विनंती केली आहे.शासनस्तरावर गरिबांच्या उत्थानासाठी चांगल्या योजना कार्यान्वित केल्या जातात. मात्र अधिकारी वर्गाकडून लोकाभिमूख योजना बासनात गुंडाळण्याचे काम करतात. परिणामी लाभार्थ्यांना योजनाचा लाभ मिळत नाही. गरिबांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने होण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्हा शल्य चिकित्सक करणार दररोज दाखला देण्याची सोयदिव्यांग कल्याण समितीचे जिल्हा सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना येथील समस्येचे निवेदन सादर केले. निराधारांना व वृद्धांना दररोज दाखला ग्रामीण रुग्णालयातून मिळावा म्हणून आग्रह केला. यावर डॉ. मुरंबीकर यांना कोणत्याही लाभार्थ्यांला वयाचा दाखला प्राप्त करण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही. दररोज वयाचा दाखला देण्याचा आदेश त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना निर्गमित केला. मात्र येथील अधीक्षकांनी अद्यापही दररोज वयाचा दाखला देण्याचे मनावर घेतले नाही, असे ग्रामीण भागाच्या लाभार्थ्यांनी सांगितले.