शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानासाठी मोखाळातील महिलांचा पुढाकार

By admin | Updated: June 25, 2014 23:41 IST

सावली तालुक्यातील चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील मोखाडा येथे सोमवारी झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत परवानधारक देशी दारू दुकान लावण्यासाठी महिलांनी ९५ टक्के प्रतिसाद दिला.

उपरी : सावली तालुक्यातील चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील मोखाडा येथे सोमवारी झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत परवानधारक देशी दारू दुकान लावण्यासाठी महिलांनी ९५ टक्के प्रतिसाद दिला. यामुळे येथे महिलांच्या पुढकारानेच, ग्रामसभेचा ठराव पारित करण्यात आला आहे. मोखाळा ग्राम पंचायतकडे परवानाधारक चिल्लर देशी दारु दुकानदाराने दुकान सुरू करण्यासाठी अर्ज सादर केला. त्यानुसार ग्राम पंचायतने सोमवारी महिलांची ग्रामसभा आयोजित केली. या सभेला २३४ महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांमधूनच अध्यक्ष म्हणून वनिता विनोद भोयर यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रियंका मशाखत्री, पंचायत समिती सदस्य अनिता चुनारकर व इतर महिला, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होत्या. सदर सभेत अर्जाचे वाचन करुन उपस्थित महिलांना नकार व होकारासाठी हात वर करण्यास सूचना केली. यावेळी केवळ २८ महिलांनी दारु दुकानाला नकार दिला तर २०६ महिलांनी दारु दुकान सुरु करण्यासाठी होकार दिला. यावरुन महिलांनीच मोखाळा येथे दारु दुकानासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक बार सुरु असून या मुख्य मार्गावरील पाच किंमी अंतरावर एक वाईन शॉप व चार बार व महाममार्गापासून दोन किमी अंतरावर केरोडा येथे देशी दारू दुकान आहे.त्यामुळे या परिसरात नवीन दारू दुकान हे काही नवे नाही अशी प्रतिक्रिया मोखाळा येथील महिलांची आहे. विशेष म्हणजे, या ठरावानंतर गावात उलट-सुलट चर्चेला उत आला आहे. (वार्ताहर)