पाच गंभीर : २१ प्रवासी जखमी, चिनोरा गावाजवळील घटना लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूरकडून भरधाव वेगाने नागपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्सने कंटनेरला मागून धडक दिली. त्यात ट्रॅव्हल्समधील २१ प्रवासी जखमी झाले. त्यात पाच प्रवासी गंभीर आहेत. सदर अपघात वरोरा शहरानजीकच्या चिनोरा गावाजवळ घडली.एमएच ४० एएफ ०७११ या क्रमांकाची बागडी ट्रॅव्हल्स चंद्रपूरकडून नागपूरकडे जात होती. वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिनोरा गावाजवळच्या एमआयडीसी रस्त्याच्या वळणावर एमएच ३४ एफ १३७७ या कंटेनरला ट्रॅव्हल्सने मागून धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील जगदीश खंडारे, मनोहर कनोजवार, विनोद उगेमुगे, संजय काळे, कुसुम जयपूरकर, रवी भुतकर, आयुश शेरकी, ईश्वर शेरेकर, अविनाश एटलेवार, मुकेश रॉय, पुरभ जयपूरकर, अनिता जयपूरकर, आदित्य रामटेके, सावी शेख, अक्षय बेलगलवार, वैभव निनावे, विवेक गुल्हाने व गुल्हाने हे जखमी झाले. यातील पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
भरधाव ट्रॅव्हल्सची कंटनेरला धडक
By admin | Updated: July 3, 2017 00:57 IST