शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

१५ गावांतील फ्लोराईडयुक्त पाणी समस्या तत्काळ दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील १५ गावात ६० नमुने फ्लोराईडबाधीत पाण्याचे नमुने आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू करणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली. आमदार सुधीर मुनंगटीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.

ठळक मुद्देमुनगंटीवार यांच्या तारांकित प्रश्नावर मंत्र्यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील १५ गावात ६० नमुने फ्लोराईडबाधीत पाण्याचे नमुने आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू करणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिली. आमदार सुधीर मुनंगटीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.राजुरा, भद्रावती, कोरपना, ब्रह्मपुरी, नागभिड, चंद्र्रपूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, मूल या १० पैकी ५ तालुक्यांमधील १५ गावात ६० नमुने फ्लोराईडबाधीत आढळले. ४५ गावातील ९१३ स्त्रोतांची तपासणी केल्यानंतर १६१ नमुने फ्लोराईडबाधित आढळले. उर्वरित ७५२ स्त्रोतांचे पाणी पिण्यास योग्य आहेत. ५४ पैकी ४५ गावांमध्ये पुरवठा योजनेद्वारे शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू आहे. उर्वरित ९ गावांपैकी ३ गावांमध्ये १ डिफ्लोरिडेशन युनिट, २ जलशुध्दीकरण सयंत्र बसविले आहे. २ गावांमध्ये जलशुध्दीकरण सयंत्र बसविले. एका गावात हातपंप व विहिरीद्वारे शुध्द पाणीपुरवठा सुरू आहे. ३ गावांमध्ये २ नळयोजना व १ जलशुध्दीकरण सयंत्र बसविण्याचे नियोजन असल्याची माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभागृहात दिली.फसवणूकप्रकरणी संचालकांना अटकएसजेएसव्ही आणि श्रीराम समर्थ सोसायटी या दोन कंपन्यांनी गुंतवणुकदारांची केलेली आर्थिक फसवणूक या विषयाकडे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाद्वारे लक्ष वेधले होते. सदर कंपनीच्या १४ संचालकांविरूद्ध गुन्हा नोंदवून १० आॅक्टोबर २०१९ रोजी तर श्रीराम समर्थ सोसायटी कंपनीच्या संचालकांना २१ डिसेंबर २०१९ रोजी अटक करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चंद्रपूर पोलीस विभागातील आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याचे उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार