शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उड्डाणपूल व रस्ते बांधकामात वापरणार ‘फ्लॉय अ‍ॅश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:56 IST

उर्जानिर्मिती प्रकल्पातून निघणाऱ्या ‘फ्लॉय अ‍ॅश’ची विल्हेवाट लावणे ही बाब मागील कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरली आहे. आता ही फ्लॉय अ‍ॅश रस्ते व उड्डाणपूल बांधकामाकरिता वापण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउर्जा निर्मिती प्रकल्पांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कप्रवीण खिरटकरचंद्रपूर : उर्जानिर्मिती प्रकल्पातून निघणाऱ्या ‘फ्लॉय अ‍ॅश’ची विल्हेवाट लावणे ही बाब मागील कित्येक वर्षांपासून डोकेदुखी ठरली आहे. आता ही फ्लॉय अ‍ॅश रस्ते व उड्डाणपूल बांधकामाकरिता वापण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिल्याने उर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना मोठा दिलासा मिळाला आहे.मागील काही वर्षात भारतात अनेक खाजगी वीज निर्मिती तसेच राज्य सरकारने उभारलेल्या कोळशापासून वीज निर्मिती प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर फ्लॉय अ‍ॅश निघते. या फ्लॉय अ‍ॅशची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न या वीज निर्मिती प्रकल्पांना भेडसावतो आहे. काही वर्षापूर्वी ही फ्लॉय अ‍ॅश सिमेंट कारखाण्यांना पाठविली जात होेती. शासकीय इमारती बांधकामाकरिता फ्लॉय अ‍ॅशपासून तयार केलेल्या विटा वापरणाऱ्यावर बंधक घालण्यात आल्याने काहीअंशी हा प्रश्न निकाली निघाला होता. परंतु पूर्णपणे विल्हेवाट लावली जात नसल्याने फ्लॉय अ‍ॅशच्या ठिगाºयाने नजीक राहणाºया नागरिकांंचे आरोग्य धोक्यात आले होते. अनेकांना श्वसनाचे आजार जडले. याबाबत शासन दरबारी अनेक तक्रारीही झाल्या.केंद्र सरकारने फ्लॉय अ‍ॅश रस्ता बांधकाम व उड्डाण पुलाच्या बांधकामाकरिता वापरण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. यामध्ये वाहतुकीचा खर्च उर्जा निर्मिती प्रकल्पाला करावा लागणार आहे. वाहतुक करण्यापूर्वी राख ओली केल्यानंतर वाहनात भरली जाणार आहे. यामुळे फ्लॉय अ‍ॅशपासून नागरिकांना जडणारे आजार कमी होईल, असेही केंद्र सरकारला वाटत आहे.अवैध उत्खननावर आळारस्त्याचे व उड्डाण पुलाच्या बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची आवश्यकता असते. त्यामुळे पुरवठाधारक मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करूनच पुरवठा करीत असल्याचे मानले जात होते. आता उड्डाल पुल व रस्ता बांधकामाकरिता फ्लॉय अ‍ॅश वापण्यात येणार असल्याने गौण खनिजाची मोठी बचत होणार असून अवैध उत्खननावर आळा बसण्याची शक्यता आहे.शासनाच्या या निर्णयामुळे फ्लॉय अ‍ॅशची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लागणार असून स्थानिक वाहतुकदरांना यापासून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे.- प्रमोद मगरे, जिल्हा प्रमुख, शिव वाहतूक सेना.

टॅग्स :Governmentसरकार