शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

झाडीपट्टीत फुलवले पांढऱ्या सोन्याचे रान

By admin | Updated: January 4, 2017 00:54 IST

पांढऱ्या सोन्याचे रान म्हटलं की वऱ्हाडाचा भाग डोळ्यासमोर उभा राहतो. विदर्भातील वऱ्हाडाचा भाग म्हणजे यवतमाळ, अमरावती, वर्धा व अकोला जिल्ह्याची आठवण येते.

एकरी एक लाखाचे उत्पादन : दोन एकरात सरी पद्धतीने लागवड राजकुमार चुनारकर चिमूर पांढऱ्या सोन्याचे रान म्हटलं की वऱ्हाडाचा भाग डोळ्यासमोर उभा राहतो. विदर्भातील वऱ्हाडाचा भाग म्हणजे यवतमाळ, अमरावती, वर्धा व अकोला जिल्ह्याची आठवण येते. तर चंद्रपूर जिल्ह्यासह, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्याला धान उत्पादन जिल्हे म्हणून ओळखले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी कृष्णाजी तपासे यांनी आपल्या दोन एकर शेतात धानाच्या शेतीसाठी अनुकूल असलेल्या जागेत पांढऱ्या सोन्याचे रान फुलविले आहे. तालुक्यात काही भागात बरेच शेतकरी कापसाची लागवड करतात. पण कृष्णा तपासे यांनी दोन एकर जागेत फुलविलेली ६५९ या कपाशीच्या वाणाची प्रायोगिक तत्त्वावर केलेली लागवड शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतीकारी तालुका म्हणून व शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था असलेला तालुका म्हणून चिमूर तालुक्याला ओळखल्या जाते. याच तालुक्यात धानाची लागवड होत असल्याने तालुक्याला झाडीपट्टीचा एक भाग म्हणून ओळख मिळाली आहे. नगदी पीक म्हणून सोयाबीन व कापसाकडे बघितले जाते. मात्र या भागात कापसाचे उत्पादन होणार की नाही, या चिंतेत परिसरातील शेतकरी असतो. त्यामुळे ते जास्त प्रमाणात कपाशीची लागवड करण्यास धजावत नाहीत. चिमूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरडवाहू शेतीत तपासे यांनी दोन एकर जागेत ६५९ या वाणाची लागवड केली. या वाणाची लागवड सरी पद्धतीने करीत खताचे व औषधीचे योग्य नियोजन केले. या योग्य नियोजनामुळे कपासीच्या एका झाडाला ७० ते ८० बोंड लागले आहेत. त्यामुळे या शेतातून एकरी २० ते २५ क्विंटल कापसाचे उत्पादन येणार आहे. पाण्याचे साधन नसल्याने कोरडवाहू कपाशीचे योग्य नियोजन करून तपासे यांनी भातासाठी पोषक असलेल्या वातावरणाच्या झाडीपट्टीत पांढऱ्या सोन्याची फुलवलेली बाग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. जिल्ह्यातील एकमेव सिमला मिरचीचे उत्पादक परिस्थितीवर विसंबून न राहता नेहमी वेगळे प्रयोग करीत शेतीतून भरपूर उत्पादन घेण्याच्या दृष्टीने कृष्णा तपासे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात एकमेव सिमला मिरचीची लागवड करून एक नवा प्रयोग केला आहे. सोबतच त्यांनी भाजीपाल्यासह अद्रकाचीही लागवड केली. त्यामुळे पारंपारिक शेतीला फाटा देत तपासे हे नेहमी प्रयोगातील शेतीवर भर देत आहेत. चिमूर येथे मागील हंगामात कॉटन इंडस्ट्रीजच्या वतीने अमृत पॅटर्नचा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात झालेल्या भाषणाने पे्ररीत होऊन ६५९ वाणांच्या कपाशीचे भरघोस उत्पन्न होऊ शकले. त्यातून अमृत पॅटर्नच्या मार्गदर्शनातून ही पांढऱ्या सोन्याची बाग बहरली. कोरडवाहू शेतीत बहरलेली ही बाग येत्या हंगामात एकरी ५० क्विंटल उत्पादन घेण्याच्या दृष्टीने एक प्रयोग करू. - कृष्णा तपासे प्रयोगशील शेतकरी, चिमूर