शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त करंजीत दारुचा महापूर

By admin | Updated: September 1, 2015 00:46 IST

तंटामुक्त मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कारप्राप्त करंजी गावात सद्यस्थितीत अवैध दारुचा महापूर वाहत असल्याचे चित्र आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांची चुप्पी : पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हगोंडपिंपरी : तंटामुक्त मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कारप्राप्त करंजी गावात सद्यस्थितीत अवैध दारुचा महापूर वाहत असल्याचे चित्र आहे. मात्र या अवैैध दारुविक्रीवर आळा घालायचा कसा, असा यश प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.राज्य शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली. मात्र ती दारुबंदी केवळ कागदोपत्री झाल्याचे चित्र तालुक्यासह जिल्ह्यात आहे. मग याला करंजी गाव अपवाद कसा राहील. करंजी गावातदेखील छुप्प्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा पुरवठा होत असून राजरोसपणे दिवसाढवय्या दारुविक्री केली जात आहे. चौकाचौकात सायंकाळच्या सुमारास बाजार भरल्यासारखे चित्र बघायला मिळत आहे. मात्र यावर सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांनीही चुप्पी साधली असल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परिणामी गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका होण्याइतपत विदारक परिस्थिती आहे. अवैध दारुविक्रेत्यांची संख्या २० च्या आसपास असून त्यात अनेक उच्चशिक्षित युवकांचाही समावेश आहे. एकेकाळी करंजी गावच्या तंटामुक्त गाव समितीच्या कार्याचे जिल्ह्यात नाव होते. समितीच्या कार्याचा गौरव केला जायचा. अवैध दारुविक्रीला आळा घालण्यासाठी समितीने विविध उपाययोजना केल्या. परिणामी अवैध दारुविक्रीला लगाम लागला. गुटखा बंदी यशस्वी ठरली. काळ्या धंद्यांना आळा बसला. याचीच फलश्रृती म्हणून गावाला तंटामुक्त मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार मिळाला. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.राज्य शासनाने दारुबंदीची घोषणा करताच अवैध दारुविक्रेत्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. गावविकासाच्या साऱ्याच पर्यायांना काळे फासत अवैध दारुविक्रीसारखे व्यवसाय चालविल्याने गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. आज गावात कोणीकोणाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. यातच करंजी-जोगापूर गटग्रामपंचायत असलेल्या या दोन्ही गावाच्या शांतता व व्यवस्थेसाठी दोन स्वतंत्र पोलीस पाटील असतानादेखील त्यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून यावर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालविले जाण्याची गरज आहे. मात्र तसेच होताना दिसून येत नाही. यावरुन पोलीस प्रशासनाचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज असून त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आहे. (तालुुका प्रतिनिधी)