शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी सिंदेवाहीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:35 IST

नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करून मागण्या पूर्ण कराव्या, यासाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात बुधवारी सिंदेवाही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देश्रमिक एल्गारचे नेतृत्व : नागरिकांचे प्रश्न सोडवा

ऑनलाईन लोकमतसिंदेवाही : नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करून मागण्या पूर्ण कराव्या, यासाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात बुधवारी सिंदेवाही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चाची सुरुवात शिवाजी चौक येथून करण्यात आली. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. निराधारांना दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावे, घरकुले मंजूर करावी, थकित असलेले बिल लाभार्थ्यांना देण्यात यावे, सिंदेवाही तालुक्यात रोहयो अंतर्गत नहराचे काम सुरू करुन सिंचनाची सोय करावी, अनेक गावात बस जात नसल्याने बससेवा सुरु करावी, अन्नसुरक्षा योजनेचा लाभ गरिबांना देण्यात यावा, सरडपार ते चिटकी या रोडचे काम सुरू करावे. तसेच चिटकी येथील स्मशानभूमीचे काम तत्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी केले. मोर्चात श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम, पुष्पा नेवारे, रवी नैताम, शशिकांत बतकमवार, गुलाब बोरुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार रावडे यांनी मोर्चास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व शासनाकडे सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. यावेळी वंदना मांदाडे, सौरभ उईके, मिलींद मडावी, प्रकाश सिडाम, अनुसया नैताम, नंदकिशोर वाकडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.