शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून शिक्षक पोटनिवडणूक मानधनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 00:26 IST

तालुक्यात ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक व सार्वत्रिक निवडणुका २०१२ ते २०१५ या कालावधीत घेण्यात आल्या. शिक्षकांना मतदान प्रक्रियेसाठी कामाला लावण्यात आले.

कार्यवाही नाही : मानधन त्वरित देण्याची पुरोगामी शिक्षक समितीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक व सार्वत्रिक निवडणुका २०१२ ते २०१५ या कालावधीत घेण्यात आल्या. शिक्षकांना मतदान प्रक्रियेसाठी कामाला लावण्यात आले. त्याच्या मानधनासाठी तहसील प्रशासनाला निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाने रक्कम प्राप्त झाले नसल्याचे कारण दाखविले आहे. पाच वर्षांचा कालावधी होवूनही शिक्षकांचे अजूनपर्यंत निवडणुकीचे मानधन देण्यात आलेले नाही.ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे पहिले प्रशिक्षण १२ आॅक्टोबर व दुसरे प्रशिक्षण १७ आॅक्टोबर २०१२ रोजी घेण्यात आले. २० व २१ आॅक्टोबरला प्रत्यक्ष निवडणुका पार पडल्या. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण १९ जुलै व दुसरे प्रशिक्षण २६ जुलै २०१५ रोजी घेण्यात आले. त्यानंतर ३ व ४ आॅगस्ट २०१५ रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणूक प्रक्रियेत शिक्षक व सहकारी कर्मचारी सहभागी होते. या विषयाला पाच वर्षांचा कालावधी लोटला असून अजूनपर्यंत पोटनिवडणूक व सार्वत्रिक निवडणुकांचे मानधन मिळाले नाही. या संदर्भात उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना ५ फेब्रुवारी २०१४ व ११ मे रोजी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती व संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मात्र अजूनपर्यंत निवेदनाची दखल प्रशासनानी घेतली नाही.ग्रामपंचायत पोटनिवडणूक व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिक्षक व कर्मचारी तसेच २०१६-१७ मध्ये बीएलओचे काम करणारे कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चिमूरचे अध्यक्ष मधुकर दडमल, सरचिटणीस विनोद महाजन, नरेंद्र मुंगले, उपाध्यक्ष राजू कापसे, योगेश देशमुख, एम.आर. शेडामे, गोविंद गोहणे, मनोज चव्हाण, रमेश मिलमिले, विजेंद्र मुरकुटे, डी.डी. रामटेके, संजय कापगते, हरिश्चंद्र कामडी, बाळकृष्ण नंदनवार तसेच बीट अध्यक्ष विजय धोंगडे, देविदास पसारे, शंकर गेडाम, अरुण चौधरी, राजू चांदेकर, गोवर्धन ढोक, सचिन शेरकी, शैलेश खरवडे आदींनी केली आहे.