शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पाच नव्या आरोग्य केंद्रांचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:36 IST

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सन २०१३ ला जिल्ह्यात पाच नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली होती;...

ठळक मुद्देजागेची अडचण : चार वर्षे लोटूनही प्रशासन ढिम्म

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सन २०१३ ला जिल्ह्यात पाच नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली होती; मात्र चार वर्षांचा काळ लोटूनही शेनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता इतर आरोग्य केंद्रांच्या बांधकामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना आजही आरोग्यसेवेची प्रतीक्षा लागून आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सध्यास्थितीत ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत. मात्र अनेक गावातील नागरिकांना उपचारासाठी लांबवर जावे लागत आहे. रूग्णांची ही अडचण लक्षात घेता क्षेत्रफळाचा विचार करून राजुरा तालुक्यातील विरूर स्टे., कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, जिवती तालुक्यातील शेनगाव, गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी व वरोरा तालुक्यातील शेगाव अशा पाच नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तत्कालीन आघाडी सरकारने मंजूरी दिली होती.लवकरच या आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून नव्या पदभरतीला मंजूरी मिळण्याची आशा होती. मात्र चार वर्षे लोटूनही शेनगाव आरोग्य केंद्र वगळता इतर आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी जागा मिळू शकलेली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होताच ठराव घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची होती. यासाठी पाचही गावातील ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ठराव घेतले. मात्र जागा उपलब्ध होवूनही प्रशासकीय कार्यवाहीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.त्यामुळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी मिळूनही नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. सध्यास्थितीवरून या रूग्णालयांची कामे आणखी चार ते पाच वर्षे पूर्ण होण्याची कोणतेही चिन्ह नसून ग्रामीण नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.या आहेत जागेच्या अडचणीविरूर स्टे. आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली असली तरी बांधकामाचे टेंडर कार्यवाहीत असल्याचे सांगितले जात आहे. भंगाराम तळोधी येथेही हीच स्थिती आहे. नांदाफाटा येथील आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली. उपलब्ध जागा गायरान जागा असल्याने निवासी उपजिल्हाधिकाºयांकडे आलेला प्रस्ताव पुन्हा तहसीलदारांकडे परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे.पोंभुर्णा व जिवती रूग्णालयाचा दर्जा जैसे-थेतत्कालीन आघाडी सरकारने जिल्ह्यात पाच नवीन प्राथमिक आरोग्य कें द्रांना मंजूरी देतानाच, पोंभुर्णा व जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रूग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे रूग्णालयात भौतिक सुविधात वाढ होवून रूग्णांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तीन वर्षे लोटूनही या रूग्णालयांना ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा न देता सुविधात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.लोकमत विशेषरूग्णालय इमारत बांधकामासाठी जागेची अडचण येत असल्याने आरोग्य केंद्राचे काम सुरू झालेले नाही. भंगाराम तळोधी आरोग्य केंद्राच्या बांधकामाचे टेंडर निघाले असून निधी मिळाला नसल्याने बांधकाम रखडले आहे. लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.- श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.