शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मृत्यूनंतर पाच लाख मिळतात, कामगारांना ठाऊकच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

जिल्ह्यात छोट्या-मोठ्या कामासह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असंघटित कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. याअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ८६२ बांधकाम कामगारांची नोंद आहे. अनेकजण तर नोंदणीकडे किंवा नूतनीकरणाकडे कानाडोळा करतात. त्यामुळे अशा कामगारांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बांधकाम कामगारांसह असंघटित कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास पात्र लाभार्थ्यांना शासनातर्फे मदत दिली जाते. मात्र याबाबत असंघटित कामगारांमध्ये जागृती नसल्याने ते शासनाच्या कल्याणकारी मंडळाच्या योजनेपासून वंचित राहतात. आतापर्यंत अपघाती मृत्यू झालेले केवळ तीनच प्रस्ताव जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडे आल्याची माहिती आहे. जिल्ह्यात छोट्या-मोठ्या कामासह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असंघटित कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. याअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ८६२ बांधकाम कामगारांची नोंद आहे. अनेकजण तर नोंदणीकडे किंवा नूतनीकरणाकडे कानाडोळा करतात. त्यामुळे अशा कामगारांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला शासनातर्फे मदत दिली जाते. मात्र याबाबत कामगारांना माहितीच नसल्याने जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडे केवळ एकच प्रस्ताव आला आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर त्यांना योग्य लाभ दिला जाणार आहे. 

जिल्ह्यात केवळ एक लाख ३८ हजार कामगारांची नोंदणीजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत. मात्र बहुतांशजण नोंदणी करण्याकडे तसेच नूतनीकरण करण्याकडे कानाडोळा करतात. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक लाख २० हजार बांधकाम कामगारांची नोंद आहे. मागील वर्षी शासनाकडून कोरोना काळात मदत देण्यात आल्याने हा आकडा वाढला. त्यापूर्वी अनेकजण नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष करीत होते. 

योजना आहे, हेच ठाऊक नाहीजिल्ह्यात अनेक प्रकारचे कामगार आहेत. मात्र बहुतांशजण कामगार कार्यालयात नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. नोंदणीकृत कामगारांसाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीद्वारे नोंदणी करावी. - संदीप सिडाम, जिल्हाध्यक्ष, असंघटित कामगार काँग्रेस, चंद्रपूर 

अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाखजिल्ह्यात बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या एखाद्या असंघटित कामगाराचा कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला किंवा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा लाभ राज्य सरकारकडून दिला जातो. यासाठी कामगार विभागाकडे तशी नोंदणी व पोलीस नोंद जोडणे आवश्यक आहे.  

दोन वर्षात केवळ तीनच प्रस्तावमागील दोन वर्षात जिल्ह्यात अपघातग्रस्त बांधकाम कामगारांचा मृत्यू प्रकरणाचे केवळ तीनच प्रस्ताव कार्यालयात सादर झाले आहे. त्यापैकी एका प्रस्तावाची पडताळणी झाली आहे. ईतर दोन प्रस्तावाची लवकरच पडताळणी करण्यात येणार आहे. 

बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रीया ऑनलाईन झाली आहे. जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ८६२ बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ४१ हजार कामगार जीवित नोंदीत आहेत. अपघाती मृत्यूसंदर्भातील तीन प्रस्ताव दाखल झाले आहेत. एका प्रस्तावाची पडताळणी झाली आहे. दोन प्रस्तावाची लवकर पडताळणी केली जाईल.  - जानकी भोईते, सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाLabourकामगार