शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख नागरिकांनी अजूनही घेतला नाही पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

जिल्ह्यात अजूनही पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या सुमारे पाच लाख असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे नागरिकांनी पहिला तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश सोमवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात १६ लाख ४१ हजार ८३० नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र आहेत. यापैकी ११ लाख ६८ हजार १२३ नागरिकांनी पहिला डोस (७१ टक्के) तर ३ लाख ६१ हजार ४०८ नागरिकांनी दुसरा डोस (२२ टक्के) घेतला आहे.जिल्ह्यात अजूनही पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या सुमारे पाच लाख असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे नागरिकांनी पहिला तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे, अशांनी दुसरा डोस घ्यावा, यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश सोमवारी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत दिले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, मनपाचे अजितकुमार डोके व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले.  जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. याचीच फलनिष्पत्ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील पाच लाखांच्यावर नागरिकांचे लसीकरण झाले. लसीचा साठा मुबलक असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.    

उत्कृष्ट लसीकरण करणाऱ्या गावांचा होणार सत्कारपहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर गावांची स्पर्धा होणार आहे. ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लसीकरण झालेली गावे यात सहभागी होऊ शकतील. 

उत्कृष्ट लसीकरण करणाऱ्या गावांची निवड प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर झाल्यानंतर तालुकास्तर आणि तालुका स्तरावर निवड झालेल्या गावांचा जिल्हा स्तरावर सत्कार होईल. दि. २३ ऑक्टोबरपर्यंत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी  गुल्हाने यांनी जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्या.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस