शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी बुजविले पाच किमीवरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:52 IST

विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

ठळक मुद्देप्रशासन मूग गिळून : श्रमदानासाठी सरसावले नागरिक

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : विरूर (रोड) ते सुब्बई या पाच किमी लांबीच्या रस्त्यावर महाकाय खड्डे पडले होते. विद्यार्थी व नागरिकांना दररोज ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. संबंधित प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. शेवटी सुब्बई येथील शिवाजी आश्रमशाळेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व ग्रामस्थांनीच श्रमदानातून पाच किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रशासनाला चांगलीच चपराक दिली आहे.राजुरापासून ३४ कि.मी. अंतरावर सुब्बई हे गाव आहे. माजी आमदार प्रभाकर मामूलकर यांचे मूळ गाव आहे. परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे येतात. राजुरा-विरूर-सुब्बई मार्गाची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. त्यामुळे परिसरातील ये-जा करणाºया नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रुग्णवाहिकांना खड्डे पार करताना प्रचंड कसरत करावी लागते. दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात. मात्र वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे काल मंगळवारी माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात गावकरी व विद्यार्थी यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान केले. रखरखत्या उन्हातही गावकरी व विद्यार्थ्यांनी हातात फावडे, टोपल्या घेऊन पाच कि.मी. लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविले. स्वत: उपस्थित राहून श्रमदान करताना प्रोत्साहित केले.या श्रमदान अभियानात गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी शिवाजी आश्रमशाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, आॅटोचालक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुख्याध्यापक डी.एस. झाडे, अंगलवार, सरपंच गजानन आत्राम, बळीराम चव्हाण, बालेश पुप्पलवार, वानखेडे, नागोसे, राठोड, मोरे, प्रशांत पवार, चंदू चापले, भाऊजी जाभोर, बाबाजी डोहने, कोरवते, सोनी व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी श्रमदान करून सामाजिक आदर्श निर्माण केला.दुर्गम भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करावे. ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दखल घ्यावी.- प्रभाकर मामूलकरमाजी आमदार, राजुरा