शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाच कारखाने; तरीही बेरोजगारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना, राजुरा तालुक्यात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती असून या संपत्तीचा फायदा घेत माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक, मुर्ली अ‍ॅग्रो, हरिगंगा या पाच सिमेंट कंपन्यांनी तालुक्यात कारखाने उभे केले.

ठळक मुद्देयुवकांमध्ये असंतोष: राजुरा, कोरपन्यातील उच्चशिक्षितांची कंपन्यांकडून थट्टा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदाफाटा : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना, राजुरा तालुक्यात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती असून या संपत्तीचा फायदा घेत माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक, मुर्ली अ‍ॅग्रो, हरिगंगा या पाच सिमेंट कंपन्यांनी तालुक्यात कारखाने उभे केले. या सिमेंट कंपन्यांच्या स्थापनेमुळे आता दोन्ही तालुके भरभराटीस येतील आणि स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी आशा होती. मात्र, या उद्योगांमध्ये कंपनी व्यवस्थापनांनी परप्रांतीयाचाच भरणा केल्याने मोठे उद्योग असूनही या भागातील युवकांसमोर बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे.बेरोजगारीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून अनेक उच्चशिक्षित तरुण कामाच्या शोधात मुंबई, पुणेकडे जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोरपना आणि राजुरा तालुक्यात असलेल्या खनिज साधनसंपत्तीचा फायदा घेत १९८० पासून या दोन्ही तालुक्यात सिमेंट कंपन्या उभारण्यात आल्या. उद्योगासाठी लागणारी शेतजमिनी कवडीमोल भावात संपादित करण्यात आल्या. तालुक्यात सिमेंट उद्योग येणार असल्यामुळे आपल्या हाताला काम मिळेल, अशी आशा येथील तरुणांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी अपाल्या सुपिक जमिनी कंपनीला दिल्या. मात्र आजघडीला ३० ते ३५ वर्षांचा कालावधी लोटत असतानाही स्थानिक बेरोजगारांना कंपनीत सामावून घेण्यात आले नाही. कंपनीने शेती संपादित केल्यामुळे आता येथील शेतकऱ्यांजवळ कसण्यासाठी शेतीही उरली नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी वाढतच गेली. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने परप्रांतीयांचा भरणा करुन स्थानिकांवर अन्याय केला. आपल्या पोटाची भाकर असलेली शेती कंपनीला दिली. कंपनीने कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन देत अल्पदरात जमिनी घेतल्या. मात्र, अद्यापही येथील तरुणांना कंपनीत नोकरी देण्यात आली नाही. शेवटी येथील शेतकऱ्यांना न्यायालयाच्या पायºया चढाव्या लागल्या. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने नोकरभरती प्रक्रियेत आमुलाग्र बदल करीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना पुन्हा डावलले.परिसरातील विविध गावांमध्ये अनेक युवक- युवती अभियंता, पदवी, आयटीआय यासारखे कौशल्यआधारीत शिक्षण घेवून नोकरीची वाट बघत आहे. मात्र, कंपनीच्या हेकेखोरपणामुळे हे सुशिक्षित तरुण मुंबई आणि पुणे येथे नोकरीच्या शोधात जात असल्याच ेचित्र दिसून येत आहे. स्थानिक कारखान्यांमध्ये अतिरिक्त काम निघाल्यास केवळ महिना दोन महिने ३०० ते ३५० रुपये रोजमजुरीने स्थानिकांना रोजगार या नावाखाली काम देण्यात येते. त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात येते. यातही संबंधित ठेकेदाराकडून स्थानिकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. त्यातच ठेकेदार बाहेर प्रांतातून कामगार आणून त्यांना मात्र कंपनीत सामावून घेतले जात आहे. अद्यापही स्थानिकांना या कंपन्यांमध्ये सामावून घेण्यात आले नाही. कंपनी व्यवस्थापनाच्या अधिनस्थ असलेल्या अनेक आस्थापनेत आजमितीस एकही स्थानिक उमेदवार दिसून येत नाही. यावरुन कंपनी व्यवस्थापन स्थानिकांना डावलत असल्याचे समजते. कंपनी व्यवस्थापनाकडून विविध आस्थापनेत निघालेल्या भरती प्रक्रियेचा कानोसासुद्धा स्थानिक उमेदवारांना लागत नाही. अनेक अनुभवशून्य उमेदवारांची भरती जोरात असून भारतातील विविध प्रांताचा माणूस मोठ्या संख्येत तालुक्यात पहायला मिळत आहे. स्थानिक युवक मात्र इतरत्र फिरत आहे.