शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोर बिबट्यासाठी लावले पाच पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:05 IST

मागील दोन दिवसात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रामदेगी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचारी सातत्याने गस्त घालत आहेत.

ठळक मुद्देकॅमेऱ्यात बिबट कैद : वनकर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : मागील दोन दिवसात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रामदेगी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचारी सातत्याने गस्त घालत आहेत.असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प(बफर) उपसंचालक गजेंद्र नरवणे यांनी लोकमतशी बोलताना दिली होती.सोमवारनंतर मंगळवारी पुन्हा बिबट्याने हल्ला केल्यानंतर मंगळवारी दुपारपासूनच परिसरात सुरु असलेल्या गस्तीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. परिसरात वेगवेगळ्या पाच ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात बोकड ठेवण्यात आले आहेत. परिसरालगतच्या गावात दवंडी देण्यात येत असून त्याद्वारे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची व जंगल क्षेत्रात न वावरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारपासून परिसरात व्याघ्र संवर्धन दल व वनकर्मचाऱ्यांची गस्त सुरु आहे. गस्तीदरम्यान बिबट आढळल्यास त्याला बेशुध्द करण्यात येणार आहे.सर्व परिस्थितीवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प(बफर)चंद्रपूरचे उपसंचालक गजेंद्र नरवणे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सहायक वनसंरक्षक जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप दुर्गेकर, क्षेत्र सहायक मत्ते, विशाल सोनुने, वनरक्षक जुमडे, केंद्रे, खडसंगी कार्यलयाअंतर्गत सर्व वनमजूर, व्याघ्र संवर्धन दलाचे पथक तैनात असून यासाठी पोलीस विभागाचीही मदत घेण्यात आली आहे. ठाणेदार कृष्णा तिवारी व पोलीस कर्मचारीही तैनात आहेत.मंगळवारच्या घटनेनंतर घटनास्थळ परिसरात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट कैद झाला असून टेकडी परिसरातच त्याचा वावर आहे. त्यामुळे गस्त वाढविण्यात आली आहे.- विशाल सोनुने ( क्षेत्र सहायक)वनपरिक्षेत्र कार्यालय(बफर), खडसंगी.

टॅग्स :leopardबिबट्याRamdegiरामदेगी