शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रेती खननप्रकरणी पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:06 IST

बेळगाव रेतीघाटावर अवैध रेती उत्खनन, शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना धमकावणे व जप्त केलेली वाहने रेतीसह पळून नेल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वाहनमालक जाफर पठाण रा. नागभीड, ज्ञानेश्वर अवसरे रा. बेळगाव तर वाहनचालक अक्षय उरकुडे रा. देऊळगाव, अजय कुळमेथे रा बेलगाव, प्रमोद भुरले रा. विलम अशी आरोपींची नावे आहे.

ठळक मुद्देमहसूल व पोलीस विभागाची कारवाई : ट्रॅक्टरमालकांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : बेळगाव रेतीघाटावर अवैध रेती उत्खनन, शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना धमकावणे व जप्त केलेली वाहने रेतीसह पळून नेल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.वाहनमालक जाफर पठाण रा. नागभीड, ज्ञानेश्वर अवसरे रा. बेळगाव तर वाहनचालक अक्षय उरकुडे रा. देऊळगाव, अजय कुळमेथे रा बेलगाव, प्रमोद भुरले रा. विलम अशी आरोपींची नावे आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील रेतीघाटाच्या लिलावाची मुदत ३० सप्टेंबरला संपली असतानाही शुक्रवारी सकाळी बेळगाव नदीपात्रात एमएच ३५ एजी ०१६४, एमएच ३४ एपी ५२०८, एमएच ३४ एपी २६६४ या क्रमांकाचे ट्रॅक्टरवरून रेतीची चोरटी वाहतूक करीत असताना तहसील कार्यालयाच्या पथकाला आढळून आले. या वाहनामध्ये एक ब्रॉस रेती भरलेली होती.रेती घाटाची मुदत संपली आहे. याशिवाय तिन्ही वाहन चालकाकडे कोणत्याही प्रकारचे रेती खननाची परवानगीपत्र नसल्याने जप्तीनामा करुन सदर वाहने तहसील कार्यालय येथे नेताना एका चारचाकी वाहनातून चार ते पाच माणसे आली. त्यांनी कारवाई करणाºया कर्मचाºयांना जिवे मारण्याची धमकी देऊन रेतीसह ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.घुग्घुस येथे रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्तघुग्घुस : परिसरातील नकोडा रेती घाटावरून अवैध रेतीचे खनन करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर नायब तहसीलदारांनी जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली. या रेतीघाटाच्या लिलावाची मुदत संपल्यानंतरही रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारावर नायब तहसीलदार सतीश साळवे यांनी अवैध रेती व माती वाहतूक करणाºयावर कारवाई केली. सदरच्या कारवाईमुळे अवैध रेती खनन करणाऱ्या ट्रॅक्टर मालकामध्ये दहशत पसरली आहे. सदर कारवाई नायब तहसीलदार सतीश साळवे यांच्यासह तलाठी दिलीप पिल्लई, प्रवीण वरभे, विशाल कुरेवार, तलवार यांच्यासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.ट्रॅक्टरचालक व ट्रॅक्टर्स नेणाऱ्या त्या व्यक्तीविरूध्द आम्ही पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी,.याबाबत आम्हीही तपास करीत आहोत.-विद्यासागर चव्हाणतहसीलदार, ब्रम्हपुरी