शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात प्रथमच ‘श्री संत गजानन गौरव गाथा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:21 IST

विदर्भाची पंढरी शेगावीचा राणा गजानन म्हणजेच माऊली श्री संत गजानन महाराज यांच्या अध्यात्म, शिकवण व विचारांवर प्रकाश टाकणारी गौरव गाथा व संगीत संध्या कार्यक्रम पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजतापर्यंत येथील चांदा क्लब ग्राऊंडवर हे भव्य आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री संत गजानन गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी दिली.

ठळक मुद्देजयंत मामीडवार : महानगर होणार गजाननमय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भाची पंढरी शेगावीचा राणा गजानन म्हणजेच माऊली श्री संत गजानन महाराज यांच्या अध्यात्म, शिकवण व विचारांवर प्रकाश टाकणारी गौरव गाथा व संगीत संध्या कार्यक्रम पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजतापर्यंत येथील चांदा क्लब ग्राऊंडवर हे भव्य आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री संत गजानन गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी दिली.या कार्यक्रमाला संत गजानन महाराज यांचे ज्यांच्या घरी वास्तव लाभले असे नागपूर येथील मुधोजी राजे भोसले यांची विशेष उपस्थिती लाभणार आहेत. संत गजानन महाराजांची गौरथ गाथा अकोला येथील गजानन महाराज यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक सुनील देशपांडे व औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील साहित्य लेखक श्रीधर वक्ते उपाख्य स्वामी दिव्यानंद सरस्वती सांगणार आहेत. गीत गजानन हा संगीतमय कार्यक्रम निरंजन बोबडे आणि संच सादर करणार आहेत. चंद्रपूरात पहिल्यांदाच व्यापक स्वरुपात होत असलेल्या या कार्यक्रमाला संत गजानन महाराज यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून श्रींच्या पालखींच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी सायंकाळी ५ वाजतापर्यंत गजाननभक्त पोहचणार आहे. विशेष म्हणजे, आयोजन समिती या पालखीचे प्रवेशद्वारावर स्वागत करणार आहे. यामध्ये वडगाव येथील गजानन महाराज मंदिर, बाबूपेठ येथील महादेव मंदिर व सिस्टर कॉलोनी येथून निघणाऱ्या श्रींच्या पालखीचा समावेश असणार आहे. श्री संत गजानन महाराज गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जंयत मामीडवार व सचिव पी. आर. देशमुख यांच्यासह अविनाश उत्तरवार, किशोर बोधे, नितीन नक्षिणे, राजेंद्र तुम्मेवार, समीर तातावार, रंजना नागतोडे, शुभम डांगे, बंडू पोटे, सचिन चिंतावार, चैताली खटी, प्रिया चौधरी, सुनंदा चिंतावार, संदीप देशपांडे, किशोर गोगुलवार, अमोल सांबरे, छबुताई वैरागडे, मूलचे डॉ. कुळकर्णी, भाऊराव ढोके, केशव मत्ते, मधुकर झाडे आदी मंडळी जय्यत तयारीला लागली आहेत.श्रींच्या साहित्यावर होणार जागरसंत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे असंख्य भक्तगण जात असतात. तेथील शिस्त, प्रसन्न वातावरण, योग्य व्यवस्थापन, कुठेही आवाज नाही. प्रत्येकांच्या चेहºयावर सेवेचा भाव. हेवेदावे नाही. ओढताण नाही. कुणाला काहीही न सांगता सारेकाही सुरळीत सुरू असते. या परिसरात गेल्यानंतर भक्तही प्रसन्न होऊनच बाहेर पडतो. यामागेही संत गजानन महाजारांचीच शिकवण, त्यांचे विचार, आचार आहे. त्यात अध्यात्मही आहे. हे कसे काय घडते. गौरव गाथाच्या माध्यमातून महाराजांची एक वेगळी ओळख भक्तांना व्हावी, महाराजांच्या साहित्यावरही प्रकाश पडावा, यातूनच ही संकल्पना पुढे आली.