शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

आधी क्वारंटाईन हो, मग घरात घेते... शेकडो किलोमीटर चालून आलेल्या मुलाला आईने नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 18:31 IST

कोरोनाने अख्या जगात कहर केला आहे. हजार किलोमीटरवरुन आलेल्या पोटच्या गोळ्याला आईने घरात नाकारलं.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोटाची खळगी भरण्याकरिता वणवण भटकणारा जीव संकटात सापडलाय. ग्रामीण भागात कामाची कमतरता असल्याने कामाच्या शोधात औरंगाबाद येथे गेलेल्या एका परिवाराची व्यथा. औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढलेला. प्रादुर्भाव पाहता लागलेली गावाची ओढ, राहवली नाही. अखेर गोंडपिपरी तालुक्यातील तारसा या स्वगावी काल दि.13 रोजी तो परत आला. परत आल्यावर त्याला झालेलं दु:ख तो आयुष्यात कधीच विसरणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.कोरोनाने अख्या जगात कहर केला आहे. हजार किलोमीटरवरुन आलेल्या पोटच्या गोळ्याला आईने घरात नाकारलं. गावकऱ्यांनीसुद्धा त्याचा तिरस्कार केला. पिण्यासाठी कुणी पाणीही देत नव्हते. स्वत: आपल्या परिवारासह विलगीकरणात राहायला तयार असताना त्याला शाळा उघडून देण्यासाठी ग्रामपंचायतीने नकार दिला. आपल्या छोट्याश्या मुलीला घेऊन तब्बल तीन तास लखलखत्या उन्हात त्याला ताटकळत उभ राहावं लागलं. पिण्यासाठी पाणी नाही. भुकेने व्याकुळ अशी अवस्था होती. अखेर त्याने दोन भिंतीच्या मधे चादर बांधून तात्पुरता निवारा बनविला आणि विसावा घेतला. असे विदारक वास्तव त्याच्या नशिबी आले. तब्बल तीन तासानंतर गोंडपिपरी ठाणेदाराच्या मध्यस्तीने त्याला राहण्यासाठी शाळा मिळाली. अखेर आईची माया ही वेगळीच. काही वेळाने आईनेच जेवणाचा डबा बनवून आणून दिला. आणि त्यांच्या पोटाला आधार मिळाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस