शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नापूर येथील बचत गटाला तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार

By admin | Updated: March 4, 2017 00:38 IST

ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर व गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

नवरगाव : ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर व गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय सरस महोत्सव स्वयंसिद्धा-२०१७ मध्ये सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील यशस्वी महिला बचत गटाला प्रथम पुरस्कार नुकताच देण्यात आला.राजमाता जिजाऊ स्वावलंबन तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, आ. बाळू धानोरकर, जि.प. अध्यक्षा संध्या गुरूनुले, जि.प. उपाध्यक्षा कल्पना बोरकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन या बचत गटाला गौरविण्यात आले.या बचत गटाने मागील तीन-चार वर्षांपासून ‘पत्रावळी गृहउद्योग’ सुरू केला असून त्यांनी गटाच्या नावाप्रमाणे यशस्वीपणे चालवित आहेत. हा नाविण्यपूर्ण व्यवसाय करून तालुक्यात आदर्श बचत गट म्हणून नावारूपास आलेला आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्राप्त देण्यात आला.या गटाच्या अध्यक्षा शालिनी मेश्राम, सचिव दिक्षा मेश्राम, सुनिता दिलीप मेश्राम, गयाबाई मेश्राम, जोशीला मेश्राम, शांता मेश्राम, पंचशिला मेश्राम, संगीता विनोद मेश्राम, विमल मेश्राम, संगीता रामकृष्ण मेश्राम, देवांगणा मेश्राम, लिला अलोणे या महिलांनी चांदा क्लब ग्राऊंडवर सदर पुरस्कार स्वीकारला. शासनाकडून अशा प्रकारचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असल्याने बचत गटांना स्फूर्ती मिळते आणि पुन्हा महिला जोमाने कामाला गती देतील, असे मत गटाच्या मार्गदर्शिका सुनिता दिलीप मेश्राम यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. (वार्ताहर)