शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

१९५९-६० ला गुंफास्थळी झाला पहिला महोत्सव

By admin | Updated: December 30, 2014 23:30 IST

बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात

रमेश नान्ने - पेंढरी(कोके)बाल माणिक यांचे गोंदेडा (गुंफा) ता. चिमूर येथे वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर १९२४ मध्ये आगमन झाले. ते आॅक्टोंबर १९२६ पर्यंत येथे वास्तव्यास होते. दरम्यान, सन १९२४-२५ व २६ या काळात तुकडोजी महाराज यांनी गुंफास्थळी साधना केली. १९ मार्च १९२७ रोजी त्यांनी आनंदामृत नावाचा आध्यात्मिक पहिला ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तुकडोजी महाराज यांनी सन १९५९-६० मध्ये पहिल्यांदा यात्रा महोत्सव गुंफास्थळी सुरु केला.९ जानेवारी १९६० ला पहिला घुगरी गोपालकाला केला आणि तोही पौष पोर्णिमेला पूर्ण चंद्राकृतीला साक्षी ठेवून. यामागे त्यांचा उद्देश असा होता की, चंद्रप्रकाशात भाविकांना रात्रीचा कार्यक्रम व उपक्रमाचा आस्वाद घेता यावा. जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज सुधारणा, संघटन, शिक्षण, सर्वधर्म समभाव आदींचा प्रसार हा देखील यामागील उद्देश आहे. या यात्रेचे सुरुवातीचे स्वरूप लोकात जावून भजन- कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करणे, भौतिक तसेच आध्यात्मिक स्वरूपात सामाजिक सुधारणा इत्यादी बाबी अंतर्भुत होत्या. त्यानंतर ६ ते ९ जानेवारी १९६३ या दरम्यान राष्ट्रसंतांच्या उपस्थितीत यात्रा महोत्सव संपन्न झाला. यामध्ये गीताचार्य तुकाराम दादा, राजे विश्वेश्वरराव आत्राम, राष्ट्रसंतांचे सहकारी गुरुकुंजचे शामराव दादा मुकदम आदी विभुती हजर होती.सन १९६३ ला एकाच वर्षी दोन पौष पोर्णिमा आल्यामुळे १९६४ ची यात्रा महोत्सव हा २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर १९६३ या दरम्यान झाला. यावेळीही महाराज तीन दिवस तपोभूमीत मुक्कामी होते. या महोत्सवात मुंबईचे अभिनेते शाहू मुळक, तत्कालिन विधानसभा सभापती आध्यात्मिक विचारवंत बाळासाहेब भारदे, शिक्षण उपमंत्री डॉ. कैलास यांचे मार्गदर्शन, हभप खंडारे व सावजी महाराज यांचे कीर्तन तथा हभप मोझरकर महाराज यांचे प्रवचन झाले होते. १५ जानेवारी ते १७ जानेवारी १९६५ च्या यात्रा महोत्सवातही राष्ट्रसंत तीन दिवस मुक्कामी होते.२४ ते २६ जानेवारी १९६७ च्या यात्रा महोत्सवादरम्यान विधानसभेच्या सार्वजनिक निवडणूका आल्या. त्यावेळेस राष्ट्रसंतांनी सर्वपक्षीय उमेदवारांना यात्रेच्या एकाच व्यासपीठावर आणले. हा संदर्भ ३ फेब्रुवारी १९६७ अनेक वृत्तपत्रांनीही दिला होता. १३ ते १५ जानेवारी १९६८ च्या यात्रा महोत्सवादरम्यानचा महाराजांचा मुक्काम अखेरचा ठरला.