शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झरण एफडीसीएम जंगलात आगीचे तांडव

By admin | Updated: April 9, 2015 01:17 IST

तालुक्यातील झरण येथील वनविकास महामंडळाच्या जंगलाला आग लागल्याने वनसंपत्तीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.

आक्सापूर : तालुक्यातील झरण येथील वनविकास महामंडळाच्या जंगलाला आग लागल्याने वनसंपत्तीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. जंगल परिसरात आगीचे तांडव सुरु असताना अधिकारी मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना पाठवून आग आटोक्यात आणण्याचे फर्माण सोडून स्वत: मात्र निवासस्थानी बसून कोणतीच हालचाल करीत नसल्याची माहिती आहे.मध्य चांदा प्रकल्पाअंर्तंगत एफडीसीएमच्या बल्लारशाह विभागात मोडणाऱ्या झरण वनपरिक्षेत्रात रविवारी सकाळपासूनच आगीचे तांडव सुरु आहे. या परिसरात लागलेल्या आगीने मार्गाच्या दोन्ही बाजूस उग्र रुप धारण करुन परिसरातील शेत शिवारावर जळत आहे. सध्या उन्हं तापत असल्याने लागलेल्या आगीला अधिक पोषक वातावरण प्राप्त होऊन ही आग जास्त पसरत आहे. वनपरिक्षेत्र झरण मधील कक्ष क्रमांक १२३ व ७५ मध्ये आग विझविण्यासाठी वनपरिक्षेत्राधिनस्त कर्मचाऱ्यांचे बळ अपूरे पडल्याने शेवटी गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यास काही प्रमाणात यश मिळाले. परंतु या वनपरिक्षेत्रात एकाच वेळी पाच जागी आग लागल्याने अपुऱ्या मनुष्यबळाअभावी बांबू व सागवानाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, आगीच्या घटनेची माहिती मिळूनही वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी निवासस्थान न सोडता अधिनस्त कर्मचाऱ्यांवर धुरा सोपवून आग आटोक्यात आणण्याचे फर्मान सोडल्याची माहिती आहे. (वार्ताहर)