शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

तब्बल १२ तास चालले आगीचे तांडव

By admin | Updated: November 1, 2016 00:49 IST

चंद्रपुरातील अंत्यत वर्दळीचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटजवळील समाधान पूर्ती बाजारला रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली.

चंद्रपूर शहरातील घटना : मनपाचे अग्नीशमन दल आग विझविण्यास अपयशी चंद्रपूर : चंद्रपुरातील अंत्यत वर्दळीचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटजवळील समाधान पूर्ती बाजारला रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने क्षणार्धात रुद्ररुप धारण केल्याने पूर्ती बाजारातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी मनपाचे अग्नीशमन दल दाखल झाले. मात्र आगीवर नियंत्रण मिळविता न आल्याने ही आग सोमवारी दुपारपर्यंत धगधगत होती. त्यामुळे मनपाच्या अग्नीशमन दलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूर्ती बाजाराला लागलेल्या आगीत सर्वच साहित्य जळून खाक झाल्याने यात सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रविवारी सर्वत्र दिवाळीच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. दरम्यान, रात्री १२ वाजताच्या सुमारास समाधान पूर्ती बाजारातील वरच्या मजल्यावर आग लागल्याचे चौकीदाराच्या निदर्शनात आले. चौकीदाराने पूर्ती बाजारचे संचालक गिरीश चांडक यांना माहिती दिली. चांडक यांनी अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान वरच्या मजल्यावर कपड्यांची शोरुम असल्याने आगीचा भडका उडून आगीचा तांडव सुरू झाला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्यापर्यंत वरच्या मजल्यावरील संपूर्ण साहित्य जळाले होते. तर मुख्य गेट बंद असल्याने अग्निशमन दलातील जवानांना बाहेरुनच आग विझवावी लागली. त्यामुळे आग खालच्या मजल्यावर पोहचून गोदामाकडे वळली. खालच्या मजल्यावरील लाकडी आलमाऱ्या व विक्रीसाठी असलेल्या तेलाच्या पिंपामुळे आग आणखी भडकली. बाजुच्या कृषी केंद्र व गुपचुप सेंटरलाही आगीने कवेत घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)मनपाचे कर्मचारीअप्रशिक्षीतमहानगर पालिकेच्या अग्निशमन पथकातील कर्मचारी स्वत:च प्रशिक्षित नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात ते असमर्थ ठरत होते. त्यानंतर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, एमईएल, बल्लारपूर पेपर मील, आयुधनिर्माणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सर्वांनीच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत आग धगधगत होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल समाधान पूर्ती बाजारचे संचालक गिरीश चांडक यांनी घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत असून गिरीश चांडक यांची विचारणा केली असता, त्यांनीही आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही, असे सांगितले. या घटनेत चार कोटींचे नुकसान झाल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. आग विझवणारे कर्मचारीच असुरक्षीतघटनेनंतर मनपाचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र आग विझवताना कर्मचारीच असुरक्षीत दिसून आले. कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साहित्य नव्हते, तर काही कर्मचारी चप्पल घालूनच आग विझवताना दिसले.आगीचे कारण अस्पष्ठआग कशामुळे लागली, याबाबत मात्र नेमके कारण कळू शकले नाही. मात्र समाधान पूर्ती बाजार बंद झाल्यानंतर रात्री १२ वाजताच्या सुमारास वरच्या माळ्यावरून आग लागल्याचा अंदाज असून फटाक्यामुळे आग लागली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू होती. अरूंद रस्त्याची अडचणरविवारी रात्री घटना घडल्यानंतर अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र अरूंद रस्त्यामुळे त्यांनाही आग विझवण्यास अडचण येत होती. आग विझवण्याचे यंत्र आगीपर्यंत पोहोचत नव्हते. तर वाहनही दूरवरच ठेवावे लागले. त्यामुळे पाण्याची धार आगीपर्यंत पोहोचत नव्हती.