शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफार्मरची आग पसरून अनेकांचे साहित्य खाक

By admin | Updated: November 15, 2014 22:43 IST

येथील कुर्झा वार्डालगत असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरला उच्च विद्युत दाबामुळे शुक्रवारी रात्री ११ वाजता अचानक आग लागली. ट्रान्सफार्मरलगतचे तार जळत जाऊन अनेकांच्या घरापर्यंत ही आग पोहचली.

ब्रह्मपुरी : येथील कुर्झा वार्डालगत असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरला उच्च विद्युत दाबामुळे शुक्रवारी रात्री ११ वाजता अचानक आग लागली. ट्रान्सफार्मरलगतचे तार जळत जाऊन अनेकांच्या घरापर्यंत ही आग पोहचली. यामुळे अनेकांच्या घरचे पंखे, टिव्ही, फ्रिजमध्ये बिघाड आला. परिसरातील २५ हून अधिक विद्युत मीटर जळून खाक झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ब्रह्मपुरी नगर परिषदेअंतर्गत येत असलेला कुर्झा वार्ड येथे यापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. आता हे गाव नगरपालिकेत समाविष्ट आहे. तरीही याला कुर्झा गाव म्हणूनच संबोधले जाते. शेतकरी व मजूर वर्ग येथे वास्तव्यास आहेत. सध्या हंगाम सुरू असल्याने सायंकाळी लवकर झोपून सकाळी लवकर उठतात. अशातच काल शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गावाजवळील विद्युत ट्रान्सफार्मरला अचानक आग लागली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र काळोख पसरला. नेमके काय झाले म्हणून अख्खे गाव जागे झाले. विद्युत ट्रान्सफार्मरमधून आगीचे लोळ निघूू लागले. ट्रान्सफार्मरजवळील विद्युत तारा जळत जाऊन अनेकांच्या घरापर्यंत ही आग पोहचली. त्यात अनेकांच्या घरातील टिव्ही, फ्रिज व पंखे जळाले. ही घटना शिवाजी चौकात घडली. तिथून तार आणखी समोर पेटत जाऊन एक किमीवरील महालक्ष्मी नगर येथेही पोहोचली.तेथीलही विद्युत ट्रान्सफारमरने पेट घेतला. तेथून पुढे ही आग वाढत जाऊन अनेकांचे विद्युत मीटर जळून खाक झाले.अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने व सोबतच घरातील साहित्य जळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. (प्रतिनिधी)