शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

दुकानाला आग लागून ७५ लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 10, 2014 00:05 IST

येथील मुख्य रस्त्यावरील राजधानी कापड दुकानाला शुक्रवारी पहाटे अचानक आग लागली.

घुग्घुस : येथील मुख्य रस्त्यावरील राजधानी कापड दुकानाला शुक्रवारी पहाटे अचानक आग लागली. यात दुकानातील कापड, फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले. पहाटे ५ वाजताच्या दरम्यान लागलेली आग सकाळी साडेसात वाजेपर्यंत नियंत्रणात आली नव्हती. आग विझविण्याकरिता एसीसी व चंद्रपूर महानगर पालिकेचे अग्निशामक वाहनांना पोलिसांनी पाचारण केले. आगीत सुमारे ७५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घुग्घुस मुख्य मार्गावरील गांधी चौक परिसरात असलेले राजधानी कापड दुकान हे आजुबाजुच्याही गावात प्रसिध्द आहे. आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास दुकानाजवळ राहणार्‍या एका इसमाला दुकानातून धूर निघताना दिसून आला. त्याने दुकानाच्या समोर राहणार्‍या व्यक्तीला सांगितले. दुकान चालविणार्‍या मुस्तफा यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. दरम्यान घुग्घुस पोलिसांना आगीची माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच एसीसी, वेकोली आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमक वाहनांना पाचारण केले. अग्निशमक वाहन येण्यापूर्वी बर्‍याच लोकांनी बोरींगचे पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग एवढी भिषण होती की आतून धूरच धूर निघत होता. ती आटोक्यात येणे शक्य नव्हते. घुग्घुस पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक वाठनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास यादव यांनी स्वत: जाऊन तातडीने अग्निशामक वाहन आणले आणि लगेच आग विझविण्याचे काम सुरु झाले. त्याचदरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेचेही अग्निशामक वाहन आले. दोन्ही पथकाने आगीवर नियंत्रण मिळविणे सुरू केले. एसीसीच्या वाहनात दोनदा पाणी भरावे लागले. आग आटोक्यात येईपर्यंत कापड दुकानातील कापड, फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले. यात ७५ लाखांचे नुकसान झाले. (वार्ताहर)