लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच्या अग्निशामक पथकाने, वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खासगी टँकरने व नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.दुपारच्या सुमारास कुर्झा वार्डातील नागरिक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना सुभाष चौकातील महादेव बावनकुळे यांच्या घराच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या प्रकाश उराडे व ईश्वर फटींग यांच्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे दिसून येताच वार्डातील नागरिकांनी तसेच ब्रम्हपुरी-अºहेर मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खाजगी टँकरने, विहिरीच्या पाण्याने, घराघरातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यातही ब्रम्हपुरी शहरातील तापमानसुद्धा अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना अडचण येत होती. सदर आगीची सूचना तात्काळ ब्रम्हपुरी न.प.ला देण्यात आली. काही वेळातच ब्रम्हपुरी न.प.चे अग्निशामक पथक व टँकरने घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण आगीच्या विळख्यात सापडलेल्या तीन तणसाच्या ढिगांना लागूनच मानवी वस्ती आहे. त्यातच महादेव बावनकुळे यांचे घर अगदी लागून आहे. त्यांच्या घराला आग लागली असती तर मानवी वस्ती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती. परंतु नागरिकांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी जवळपास दोनशे नागरिकांनी त्वरित धाव घेत मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या आगीची सूचना तात्काळ नपच्या अग्निशामक पथकाला देण्यात आली. खासगी टँकरचीसुद्धा मदत घेण्यात आली. त्यामुळे मानवी वस्तीला आग लागण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.मात्र अचानक लागलेल्या सदर आगीत प्रकाश उराडे व ईश्वर फटींग यांचे तणसीचे ढीग पूर्णता जळून खाक झाले. त्यामुळे त्यांच्या जनावरांच्या चाºयाचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
तणसाच्या ढिगांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:16 IST
ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच्या अग्निशामक पथकाने, वार्डातील नितीन आंबोरकर यांच्या खासगी टँकरने व नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणली.
तणसाच्या ढिगांना आग
ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला : जवळच होती घरे