शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची ‘फायर फायटिंग’

By admin | Updated: September 26, 2015 00:56 IST

राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता : चतुर्थ कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा भारचंद्रपूर : राज्यशासनाने २००६ मध्ये जीव सुरक्षा कायदा अंमलात आणला. तब्बल नऊ वर्षानंतर मनपा प्रशासन या कायद्याची शहरात अंमलबजावणी करीत आहे. मनपा अग्निशमन विभागाचा डोलारा चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरु आहे. त्यामुळे हे अप्रशिक्षित कर्मचारी फायर फायटिंगसाठी दोन हात कसे करणार, असा प्रश्न मनपाच्याच नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. मात्र, या प्रश्नावर महापौरांसह आयुक्त अनुत्तरीत झाल्याने फायर फायटिंगच्या यशस्वी अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात अनेक ठिकाणी अवैध इमारती बांधण्यात आल्या आहेत. गल्लीबोळात डॉक्टरांनी दवाखाने थाटून व्यवसाय सुरु केला आहे. आजही अनेक डॉक्टरांनी पालिकेकडे साधी नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे अवैध इमारतींवर बुलडोझर चालवून नंतर फायर आॅडीटची अंमलबजावणी केल्यास ती यशस्वी होईल, असे नगरसेविका सुनिता लोढिया यांनी म्हटले आहे. तर आता जे चतुर्थश्रेणी कर्मचारी अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. त्यांना कोणतेही प्रशिक्षण नाही, सुरक्षा साधने नाहीत. त्यामुळे या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना आधी सोयी सुविधा पुरवाव्या. सोबतच प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करुन नंतरच फायर फायटिंग राबवावी, अशी मागणी बलराम डोडाणी यांनी केली. फायर फायटिंगचे काम एका एजन्सीमार्फत केले जात आहे. इमारत बांधकामाचे प्रमाणपत्र, मालकी हक्क आणि अन्य कागदपत्रे सादर केलेल्यांना फायर फायटिंग प्रमाणपत्र दिले जाते. आतापर्यंत शहरातील ७६ नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यातील ३५ लोकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. केवळ अंतर्गत व्यवस्था म्हणून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून कामे करवून घेतली जात आहेत. येथे कुणीही प्रशिक्षीत कर्मचारी नाही. मात्र, त्यांना सुरक्षा साधने पुरविली जात असल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी बेग यांनी सांगितले आहे. (शहर प्रतिनिधी)