शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वडसी येथे आगीचे तांडव

By admin | Updated: June 2, 2016 02:36 IST

चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या वडसी येथील रवी सखाराम मेश्राम व दिगांबर सखाराम मेश्राम यांच्या घराला व गोठ्याला ...

दोन घरे जळाली : गावकऱ्यांच्या मदतीने मोठा अनर्थ टळलानेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या वडसी येथील रवी सखाराम मेश्राम व दिगांबर सखाराम मेश्राम यांच्या घराला व गोठ्याला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या दोघांचीही घरे गावाच्या मधोमध असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी एकसंघ होऊन पाण्याची व्यवस्था करीत भगीरथ प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.वडसी या गावाच्या मधोमध रवींद्र मेश्राम व त्यांचे मोठे भाऊ डॉ. दिगांबर मेश्राम यांच्या घराला अचानक आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने क्षणार्धात उग्ररुप धारण केले. आग पसरत जाऊन अनेक घरांना आपल्या कवेत घेईल, या भीतीने नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. गावातील महिला, पुरुष मुले-मुली सर्वांनी मिळेल तिथून पाण्याची सोय आग विझविण्यासाठी केली. गावातील पूर्ण बोअरवेल बंद असून विहिरी कोरड्या आहेत. तरीही आगीवर नियंत्रण आणण्याकरिता गावकऱ्यांनी अटीतटीचे प्रयत्न केले.गोठ्यालाही आग लागल्याने गोठ्यातील जनावरांनी पळ काढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या गोठ्यामध्ये वाड्यातील संपूर्ण जनावरांचा चारा, शेतीचे साहित्य, धान्य, असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. गावात पाणी मुबलक नसल्याने गावातील लोकमतचे वार्ताहर नितीन पाटील यांनी ठिकठिकाणी संपर्क साधून आग विझविण्याकरिता टँकर बोलावले. त्यामुळे आग विझविण्याकरिता मोठी मदत झाली. वृत्त लिहिपर्यंत आगची धग चालूच होती. घटनास्थळाला भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. शिवरकर, डॉ. हटवादे यांनी भेट देऊन टँकरची व्यवस्था करून दिली. (वार्ताहर)