शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

जिल्ह्यात आगीचे तांडव

By admin | Updated: March 26, 2016 00:39 IST

या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात आगीने तांडव घातले. कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील बांबू डेपोला आग लागली.

लाखोंचे नुकसान : कन्हारगाव, विसापूर, घुग्घुस व चंद्रपुरातील घटनाचंद्रपूर : या दोन दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात आगीने तांडव घातले. कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील बांबू डेपोला आग लागली. विसापुरातील घराला आगीने कवेत घेतले, घुग्घुसमध्ये एका शाळेला आग लागली तर चंद्रपुरात चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या घटनात सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील गजबजलेल्या वस्तीत शुक्रवारी भरदुपारी घराला आग लागली. यात शेतीपयोगी साहित्य, जनावरांचा चारा, सिंचनाचे पाईप आगीच्या भक्षस्थानी सापडले. यामुळे दोन भावडांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. नागरिकांच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला. चंद्रपूर महानगरपालिका व बल्लारपूर नगरपालिकेच्या तीन अग्निशमन दलाच्या पथकाने दोन तासाच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविले. विसापूर येथील बापुराव गोसाई उलमाले व सुभाष गोसाई उलमाले या दोन भावंडाचे घरे एकमेकाला लागून आहेत. त्यांच्या घराला लागून असलेल्या एका घरात जनावरांचे वैरण, सिंचनाचे पाईप व शेतीचे औजारे ठेवली होती. घरातील लोक शेतात कामाला गेले होते. दरम्यान, घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. शेजाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने गावकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते.येथील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे व उपसरपंच सुनील रोंगे यांनी बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने बल्लारपूर नगरपालिकेच्या दोन अग्निशमन दलाचे वाहन लगेच घटनास्थळी रवाना केले. त्या पाठोपाठ चंद्रपूर येथील महानगरपालिकेतील अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलातील पथकाने शर्तीचे प्रयत्न करून दोन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाचे वाहन वेळीच दाखल झाले नसते तर परिसरातील दहा-बारा घरे आगीच्या विळख्यात सापडले असते. मात्र मोठा अनर्थ टळला.बल्लारपूर तालुक्यातीलच कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कन्हारगाव स्थित विक्री आगारातील बांबु डेपोला होळीच्या दिवशी आग लागली. त्यात १० ते १२ हजार बांबु जळून खाक झाला. त्याची विक्री किंमत ३ ते ३ लाख ५० हजार असल्याचे समजते. मात्र वनाधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांच्या सतर्कतेने करोडो रुपये किंमतीचा बांबू आगीपासून वाचविण्यात मोठे यश आले.मध्य चांदा वनविकास महामंडळाचे चारही वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांबु तोडण्याचे काम सुरू आहेत. डिसेंबरपासून प्रत्यक्षात बांबु कटाईच्या कामाला सुरूवात झाली. तोडण्यात आलेला बांबु व बांबु बंडल कन्हारगाव विक्री आगारात विक्रीसाठी साठविण्यात आला आहे. २३ मार्चच्या सायंकाळी ६ वाजता कन्हारगाव क्षेत्रातील कक्ष क्र. ७३ मध्ये वणवा भडकला. त्याची झळ रात्री ८.३० वाजता कन्हारगाव डेपोपर्यंत पोहचली. कक्ष क्र. ७३ ची आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. मात्र अचानकपणे आगीने उग्र रूप धारण करून कन्हारगाव - चिवंडा रोडलगत असलेल्या बांबुपर्यंत पोहचली. त्यात विक्रीसाठी २५ ते ३० लाख बांबु जमा करण्यात आलेला आहे. त्यापैकी १० ते १२ हजार बांबु आगीत जळून खाक झाले. आगीचे भयानक रूप पाहून वनधिकारी व वनकर्मचारी हादरले. बांबुला लागलेली आग आटोक्यात येत नव्हती. दरम्यान, वनाधिकारी प्रफुल निकोडे यांनी कन्हारगावातील जंगलातील आगीवर प्रतिबंधक करण्यासाठी मदत मागितली व सर्व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तदनंतर रात्री १२ वाजता आगीवर पुर्णत: नियंत्रण मिळविण्यात आले.सहायक व्यवस्थापक वाघ, वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे, वनवा प्रतिबंधक अधिकारी अजय पवार, कन्हारगावातील उपसरपंच प्रदीप कुळमेथे, पोलीस पाटील, ग्रा.पं. सदस्य व समस्त गावकऱ्यांनी महत्वपूर्ण कामगिरी करीत वनविभागातील महत्वाचे २५ लाख बांबु आगीपासून वाचविले व ३ ते ४ कोटीचे रुपयाचे मोठे नुकसान टळले. (लोकमत चमू)नकोडा तेलगू हायस्कूलला आगघुग्घुसजवळ असलेल्या नकोडा जिल्हा परिषद तेलगू हायस्कूलच्या स्टोअर रूमला आग लागली. यात बेंचेस जळाले. एसीसी व चंद्रपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले.ही घटना गुरुवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य ब्रीजभूषण पाझारे , सरपंच तनुश्री बांदूरकर, उपसरपंच आरिफ हनीफ शेख, किरण बांदूरकर यांनी शाळेकडे घाव घेतली.