शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा (खु.) येथे बैलाच्या गोठ्याला आग

By admin | Updated: May 26, 2017 00:19 IST

देवाडा खुर्द येथील शेतकरी नीलकंठ नैताम यांच्या घरासमोरील मांडवाला बुधवारला अचानक आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : देवाडा खुर्द येथील शेतकरी नीलकंठ नैताम यांच्या घरासमोरील मांडवाला बुधवारला अचानक आग लागली. या आगीने गुरांच्या गोठ्याला वेढल्याने अनेक शेती साहित्य जळून खाक झाले. या घटनेत ५० हजार रूपयाचे नुकसान झाले. गावकरी व महसूल प्रशासनाच्या पाण्याच्या टँकरने आग विझविण्यात आली. देवाडा खुर्द येथील शेतकरी निळकंठ नैताम यांनी गोठ्याजवळ गुरे बांधण्यासाठी मांडव उभारला आहे. मात्र बुधवारी दुपारी २ वाजता मांडवाला अचानक आग लागली. मांडवावर तुरी पिकाचे तुराट्या असल्याने आणि त्याच्या खाली थोडी तणस असल्याने आगीचा भडका उडाला. संपुर्ण मांडव व गुराच्या गोठ्याला आगीने कवेत घेतले. तेव्हा शेजारच्यांनी आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले आणि मिळेल त्या साहित्याने पाणी टाकून आग विझवू लागले. त्यानंतर तलाठी कनकुळवार यांनी मोक्यावर येऊन पाहणी करून तहसीलदार हरीश गाडे यांना ही माहिती दिली.त्यांनी लगेच पाण्याची मोठी टॅकर घटनास्थळी पाठविली. आग विझण्यास मदत झाली. मांडवाखाली बैल बांधून असल्याने आगीचे चटके लागताच बैल दोर तोडून पसार झाले. त्यामुळे जनावरे बचावली. या आगीत कृषी अवजारे जळाल्याने ५० हजार रूपयाचे नुकसान झाले असून तहसीलदारांनी शासकीय स्तरावरून नुकसान भरपाई मिळवून देण्याची अशी मागणी आहे.