लाखाचे नुकसान : बोडधा येथील घटनाब्रह्मपुरी : तालुक्यातील बोडधा येथे गुरूवारी दुपारी फटाक्यामुळे घराला आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ब्रह्मपुरीपासून ३५ किमी अंतरावरील बोडधा येथील लोकमित्र बांबोळे यांचे राहते घर आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावात फटाके फोडण्यात आले. त्याच रात्री लोकमित्र बांबोळे यांच्या घरावर फटाक्याची ठिणगी पडली.त्या ठिणगीने सकाळी रौद्ररूप धारण केले आणि काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.गावातील काही नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला असता, आग आटोक्यात न आल्याने रोख आठ हजार रुपये, एक तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, दोन्ही मुलीच्या नावे असलेले चार-चार हजारांचे रोखे, तांदळाचे चार पोते, कपडे, घरातील इतर साहित्य आगीत स्वाहा झाले. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
फटाक्यामुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक
By admin | Updated: November 14, 2015 01:12 IST