शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

१३ तालुका न्यायालयात बसविणार अग्निशमन यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:20 IST

जिल्ह्यातील १३ तालुका न्यायालयात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्टÑ अग्निशमन सेवा विभागातील तज्ज्ञांनी सदर प्रस्तावात नमूद अग्निप्रतिबंधक उपाययोजना सूचविल्या होत्या. दरम्यान, महाराष्टÑ अग्निशमन सेवा संचालनालयाने या उपाययोजनांना सहमती प्रदान केली. त्यामुळे तालुका न्यायालयातील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.

ठळक मुद्दे३ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर : राज्य अग्निशमन सेवा संचालनालयाकडून शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील १३ तालुका न्यायालयात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्टÑ अग्निशमन सेवा विभागातील तज्ज्ञांनी सदर प्रस्तावात नमूद अग्निप्रतिबंधक उपाययोजना सूचविल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने या उपाययोजनांना सहमती प्रदान केली. त्यामुळे तालुका न्यायालयातील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.राज्यातील सर्व जिल्हा व तालुका न्यायालयात अग्निशमन यंत्रणा बसवावे, यासाठी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व न्यायालयीन इमारतींचे फायर आॅडीट करण्याचे काम सुरू करण्यात आले. याचीच फलश्रृती म्हणून अग्निशमन यंत्रणा उभारणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रपुरातील जिल्हा व सत्र न्यायालय व त्यांच्या नियंत्रणाखालील इमारती तसेच वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, पोंभुर्णा, बल्लारपूर, गोंडपिपरी, मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व नागभीड येथील न्यायालयीन इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र अग्निशमन सेवेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सदर प्रस्तावात अग्निप्रतिबंधक उपाययोजना सूचविल्या होत्या. या शिफारशी नुसारच न्यायालयीन इमारतींत अग्निशमन यंत्रणा बसविण्याची कामे करण्यासाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या संचालकानी सहमती दर्शविली आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सुचित केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सन २०१७-१८ च्या दरसूचीवरील अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी तयार केली होती. वरिष्ठांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विभागाने मान्यता दिल्याने जिल्हा न्यायालयाच्या नियंत्रणातील सर्व इमारती तसेच, वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, पोंभुर्णा, बल्लारपूर, गोंडपिपरी, मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व नागभीडच्या न्यायालयीन इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारणी केली जाणार आहे. अंदाजपत्रकातील संगणकीकरणाची तरतूद वगळून चार टक्के आकस्मिक खर्च व आठ टक्के सेंटेज चार्जेस असे एकूण ३.३२ कोटींच्या निधी आज मंजूर झाला.सर्वाधिक ९०.४४ लाखांचा निधी चंद्रपूरलासर्वाधिक ९० लाख ४४ हजार रुपये चंद्रपूर तालुक्याला मंजूर झाले आहे. पाठोपाठ वरोरा तालुक्याला ५८ लाख ५८ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. सर्वात कमी ११ लाख ९ हजारांचा निधी भद्रावतीला मंजूर झाला आहे. पोंभूर्णा, बल्लारपूर, गोंडपिपरी व सिंदेवाहीला प्रत्येकी १३ लाख ८१ हजार, चिमूरला १९ लाख ८२ हजार, राजुरा १९ लाख ८ हजार, ब्रह्मपुरी १९ लाख ६१ हजार व सावलीला १९ लाख ४४ हजार आणि मूल व नागभीडला प्रत्येकी ११ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.