लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील जामणी येथील रहिवासी शेतमजूर कल्पना शंकर तुमराम ही महिला कवडू खारकर यांच्या शेतात ५ जानेवारीला काम करीत असताना रानडुकरांने हल्ला केला. त्यामुळे मदत देण्यात आली.हल्ल्यात कल्पना तुमराम या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते छोटूभाई शेख यांनी वनविभागाकडे पाठपुरावा करुन आर्थिक मदत मिळवूण देण्यासाठी प्रयत्न केले.त्यानंतर टेमुर्डा उपक्षेततंर्गत पिडित महिलेला वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. आक्केवार यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी संतोष आतकर, नगर पालिकेचे आरोग्य समिती सभापती शेख जैन्नुदिन शेख, विनायक मत्ते, नंदू पवार, एन. के. करकाडे आदी उपस्थित होते.
रानडुकराच्या हल्ल्यात जखमी महिलेला आर्थिक मदत
By admin | Updated: May 21, 2017 00:34 IST