गेवरा : सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत पाथरी उपक्षेत्राच्या मेहा बिटात मेहा बुज. येथील शांताबाई गिरीधर भोयर ही महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. बुधवारी आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सात लाख रूपये आर्थिक मदतीचा धनादेश मृताच्या पतीस देण्यात आला.वनविभागाच्या वतीने शासन निर्णयाप्रमाणे मृताच्या कुटुंबियास ८ लाख रुपये आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. घटनेच्या दिवशी एक लक्ष तर उर्वरीत सात लाख रुपयाच्या धनादेश आ. वडेट्टीवार यांचे हस्ते मृताचे पती गिरीधर भोयर यांना देण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य यशवंत शिडाम, सरपंचा कल्पना भोयर, यशवंत बोरकुटे, राजेंद्र भोयर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. राठोड, क्षेत्रसहाय्यक तामरे व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
वाघाच्या हल्ल्यात मृताच्या वारसाला आर्थिक मदत
By admin | Updated: June 11, 2016 01:00 IST