शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर गावकऱ्यांसमोर वनाधिकारी नमलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी उपवनसंरक्षक (बफर) चंद्रपूर यांच्यासोबत गावकऱ्यांची तत्काळ मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याबाबत उपाययोजना करता येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात वन्यजीव - मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तालुक्यात आजपर्यंत वाघाने १४ बळी घेतले असताना वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभाग कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाही. असे असतानाच नुकताच पडझरी येथे शुक्रवारी वाघाने हल्ला करून युवा शेतकऱ्याला ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच व गावकऱ्यांनी काँग्रेसचे नेते संतोष रावत यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती देताच तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाघाला जेरबंद करण्याची व कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले.वन्यजीव - प्राणी संघर्षावरून गावकरी व वनविभागाचे अधिकारी आमने सामने आले. वाघाला जेरबंद केल्याशिवाय घटनास्थळावरून वनाधिकारी व पोलीस अधिकारी यांना जाऊ देणार नाही, अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतल्याने धास्तावलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांनी उपवनसंरक्षक (बफर) चंद्रपूर यांच्यासोबत गावकऱ्यांची तत्काळ मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याबाबत उपाययोजना करता येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले. त्यानुसार शनिवारी दुपारी २ वाजता वनविभागाच्या रेस्ट हाऊस येथे स्थानिक सरपंच व गावकऱ्यांची उपवनसंरक्षक  गुरुप्रसाद यांच्यासोबत मीटिंग घेऊन वाघाला जेरबंद करण्याची ग्वाही देण्यात आली.

वाघ जेरबंद करण्याची कार्यवाही सुरूवनविभागाचे कर्मचारी वाघाला जेरबंद करण्यासाठी कामात लागले असल्याने वाघ केव्हा जेरबंद होईल, याकडे सर्व गावकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश  रत्नावार, कोसंबी ग्रामपंचायत सरपंच रवींद्र किसन कामडी, मारोडा येथील सरपंच भिकारू शेन्डे,  भादुर्णी येथील सरपंच  रेवता सोनुले,  मोरवाही येथील सरपंच अनुराधा प्रमोद नेवारे, लोकनाथ नर्मलवार, उश्राळा येथील सरपंच बंडू नर्मलवार,  सरपंच वंदना पेन्दोर, उपसरपंच वर्षा प्रवीण आरेकर,  सुरेश फुलझेले, अशोक पुल्लावर  उपस्थित होते.

वाघाला जेरबंद करण्यासाठी कर्मचारी कामाला लागले असून मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता जंगल सभोवताल सौरऊर्जेचे कुंपण लावून देण्यात येणार आहे.-जी.आर. नायगमकर वनपरिक्षेत्र अधिकारी मूल

 

टॅग्स :forest departmentवनविभाग