शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उसगाववासीयांनी तीन तास रोखली कोळसा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:30 IST

फोटो घुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून उसगाव-एसीसी रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबवा, अशी मागणी उसगाव ग्रामपंचायतकडून वारंवार केल्यानंतरही ...

फोटो

घुग्घुस : गेल्या अनेक दिवसांपासून उसगाव-एसीसी रस्त्याने होत असलेली कोळसा वाहतूक थांबवा, अशी मागणी उसगाव ग्रामपंचायतकडून वारंवार केल्यानंतरही कोळसा वाहतूक बंद झाली नसल्याने रविवारी उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी नांदेडकर घटनास्थळी दाखल झाले व सरपंच, एसीसीचे सुरक्षा अधिकारी जोगेंद्रसिंग यांच्याशी चर्चा करून रस्त्यावर तत्काळ बॅरिकेड लावून कोळसा व जड वाहनांना बंद करण्याचा निर्णय झाल्याने तीन तासांनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

रविवारी सकाळी ११ वाजता उसगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच नविता ठाकरे यांनी उसगाव एसीसी रस्त्यावर वाहतूक रोखून धरली. पोलीस, दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांनी घटनास्थळी पोहोचून समस्या जाणून घेतल्या व तत्काळ एसीसी सुरक्षा व्यवस्थापक जोगेंद्रसिंग यांच्या व सरपंचाचे पती धनंजय ठाकरे व उपस्थितांसोबत चर्चा करून या रस्त्यावर एसीसीने बॅरिकेड्स लावून कोळसा वाहतूक थांबविण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तोवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बॉक्स

मनाई असतानाही वाहतूक सुरूच

उसगाव ते एसीसी हद्दीपर्यंत ग्रामपंचायतने सीएसआर फंडातून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला. मात्र या रस्त्यावरून पैनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकदाराकडून कोळसा वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. विशेषतः कोळसा वाहतूक तारपोलीन न बांधता होत असल्याने वाहनातून कोळसा खाली पडून रस्त्याने दुचाकी, सायकल, पायदळ चालणाऱ्या लोकांच्या अंगावर पडून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसा वाहतूक एसीसी-घुग्घुस सिमेंट मार्गाने करण्यास मनाई असली तरी कोळसा वाहतूक करणाऱ्या मोठ्या कंपन्या या रस्त्याचा उपयोग करीत असल्याने घुग्घुस गावातील लोकांना वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत होता. या संदर्भात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले. मात्र काहीही झाले नाही. प्रश्न सुटत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रश्न सोडविण्याची वेळ आली.