चंद्रपूर : येथील लक्ष्मीनारायण मंदिर रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील पासबुक प्रिंटिंग मशीन बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच व्यवस्थापनाने लगेच पासबुक प्रिंटिंग मशीनची दुरुस्ती केली. त्यामुळे आता खातेदारांना पासबुकवर जमा खर्चाची नोंद करुन देण्यात येत आहे.
शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर रोडवरील बँक ऑफ इंडियाची मुख्य शाखेतील पासबुक प्रिंटिंग मशीन अनेक दिवसांपासून बंद होती. तसेच बँकेमधून सुद्धा पासबुकवर नोंद करून देणे बंद होते. तसा बोर्डच लावण्यात आला होता. त्यामुळे ग्राहकांची मागील अनेक दिवसांपासूनच्या व्यवहारांची पासबुकवर नोंदच झाली नव्हती. याबाबतचे वृत २४ मार्चच्या ‘लोकमत’च्या अंकात झळकताच व्यवस्थापनाने अभियंत्याकडून मशीनची दुरुस्ती केली. तसेच बॅंकेतील प्रिंटरच्याद्वारे सुद्धा पासबुकची नोंद सुरु केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या बॅंकेतील व्यवहाराची नोंद मिळत आहे.