शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:07 IST

वरोरा ते करनुल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषणाला बसलो होतो.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : दिले लेखी आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा ते करनुल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषणाला बसलो होतो. मात्र शुक्रवारी या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी लिखित स्वरुपात दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची आल्याची माहिती आ. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आ. धानोरकर म्हणाले, जिल्ह्यात सुरू असलेल्या टॉवर लाईन कामाच्या सद्यस्थितीबाबत आयोजित बैठकीत उपविभागीय अधिकारी समितीकडून मुल्यांकन करून संबंधित शेतकऱ्यांना जागेचा अंदाजित मोबदला देण्याचे ठरले होते. या बैठकीच्या कार्यवृत्ताला केराची टोपली दाखविण्यात आली.पॉवर ग्रीड तथा इतर कंपन्यांमार्फत उभारण्यात टॉवरचे बांधकाम वा टॉवरची उभारणी करीत असताना शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होत असते. तसेच शेजारच्याही शेतकºयांचे नुकसान होत असते. सदर शेतकºयांनादेखील शेतपिकाचा योग्य मोबदिला देण्याचे कंपनीने मान्य केले. अशा सर्व बाधित शेतकºयांची प्रकरणे निकाली काढून मोबदला निश्चित करून आपल्या स्तरावर मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आपण प्रशासनाकडे केली होती. ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. याशिवाय टॉवर उभारणीच्या वेळेस पिकांचे नुकसान, लाईन ओढताना (दोन लाईनच्या मधील) पिकांचे नुकसान, लाईन व टॉवरमधील कॉरीडोअरच्या मध्ये येणाऱ्या झाडांचे नुकसान, यावर भरपाई मिळवून देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे आ. धानोरकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, सुरेश पचारे आदी उपस्थित होते.