गांगलवाडी: ब्रह्मपुरी तालुक्यात गांगलवाडी, मेंडकी, मुडझा, चौगाण, अऱ्हेरपीपडगाव असे एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० ते ३२ पदे मंजूर आहेत. परंतु या आरोग्य केंद्रात जवळपास आठ ते दहा पदे रिक्त असल्याने केंद्रातील वैद्यकीय सेवेला रिक्तपदाचे ग्रहण लागले आहे.रिक्त पदामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना रुग्णांना सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आरोग्य केंद्रांपैकी तीन केंद्रात औषधी वितरक पद दोन ते तीन वर्षापासून रिक्त आहे. सदर पद प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक असताना रिक्त ठेवून रुग्णांच्या जीवनाशी खेळल्या जात असल्याचे चित्र आहे. औषधी वितरक पद रक्त असल्यामुळे सध्या औषधी वितरणाचे काम नर्स करताना दिसतात. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रिक्त पदे त्वरित भरुन रुग्णांन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पद भरावे
By admin | Updated: January 5, 2015 23:01 IST