शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:20 IST

चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करून करावे, यासाठी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सोमवारी विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सोमवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरातील खड्ड्यांनी एकाच आठवड्यात दोघांचा नाहक जीव घेतले. या घटनेला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा व संबंधित कंत्राटदारासह लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रशासनाच्या चुकीचे प्रायश्चित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करून करावे, यासाठी हा मुद्दा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सोमवारी विधानसभेत मांडणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.चंद्रपूर-मूल हा नागपूर मार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गाने नेहमी लोकप्रतिनिधींचा राबता असतानाही या रस्त्याचे बांधकाम झालेले नाही. या मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे बुजविणे गरजेचे होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गकडे गेला आहे. रस्त्यात एकही खड्डा पडला की तो लगेच कंत्राटदारामार्फत बुजवावा लागतो. मात्र येथे असंख्य खड्डे पडले असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या घटनेला हा विभाग आणि कंत्राटदार जबाबदार आहे, असा आरोप आ. वडेट्टीवार यांनी केला. या खड्ड्यांनी नंदा बेहरम या शिक्षिकेसह काजल पाल या एमबीएच्या विद्यार्थिनीचा बळी घेतला. काजल ही एकुलती एक मुलगी असून ती त्या घराचा आधार होती. त्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी सायंकाळपर्यंत मदत मिळाली नाही, तर परिणाम वाईट होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हा अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, महिला काँग्रेसच्या नंदा अल्लुरवार, माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया, बल्लारपूर तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, संतोष लहामगे, सुभाष गौर, शिवा राव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.फुटपाथ कमी करण्यासाठी अडीच कोटीचंद्रपूर शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत रस्ता अपुरा पडत असल्यामुळे अडीच कोटी महानगर पालिकेने मंजुर केले आहे. शहरात अमृत योजनेसाठी रस्ते फोडणे सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर फुटुपाथ कमी करता येते. आधीच फुटपाथ फोडून ते अरुंद करणार आणि नंतर पुन्हा अमृतसाठी रस्ते फोडणार हा प्रकार मनपा करीत आहे. याला काँग्रेस नगरसेवकांनी विरोधही केला, याकडेही लक्ष वेधून नाराजी व्यक्त केली.दारूबंदीला विरोध नाही, अंमलबजावणी करादारूबंदीला आमचा विरोध नाही. मात्र या दारुबंदीने पोलिसांचे बंगले बनत आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंद झाली नाही, तेथील ठाणेदारांवर कारवाई करून दारू हद्दपार करावी, याकडेही लक्ष वेधले.