शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

फाईल कॉम्पॅक्टरचे उद्घाटन

By admin | Updated: August 25, 2014 23:53 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेख कक्षात बसविण्यात आलेल्या आॅटोमॅटिक फाईल कॉम्पॅक्टर मशिनचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले.

चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेख कक्षात बसविण्यात आलेल्या आॅटोमॅटिक फाईल कॉम्पॅक्टर मशिनचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व अभिलेखे सुरक्षित साठविण्यासाठी तीन अ‍ॅटोमॅटिक फाईल कॉम्पक्टर अभिलेख कक्षात बसविण्यात आले. एका फाईल कॉम्पॅक्टरमध्ये अंदाजे दिड हजार फाईल साठविल्या जातात. हे कॉम्पॅक्टर अ‍ॅटोमॅटिक असल्यामुळे ज्या फाईलची आवश्यकता आहे. त्या फाईलची कमांड कॉम्प्युटरला देताच फाईल तात्काळ उपलब्ध होते. ही आधुनिक पद्धती जिल्हाधिकारी कार्यालयात बसविण्यात आल्यामुळे फाईल शोधने सुलभ होणार आहे.वीज पुरवठा खंंडित झाल्यावरसुद्धा हे कॉम्पॅक्टर काम करत असल्यामुळे फाईल शोधण्याच्या कामात अडथळा येणार नाही. त्याचप्रमाणे मॅन्युअलीसुद्धा फाईल शोधण्याची सोय या मशिनमध्ये देण्यात आली आहे. अशा प्रकारचे कॉम्पॅक्टर प्रत्येक तहसील कार्यालयात बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग व तहसीलदार विलास वानखेडे उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)