शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्यासाठी वैधानिक मार्गाने लढा उभारणार

By admin | Updated: June 1, 2016 01:26 IST

विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला.

अनिल किलोर : जनता महाविद्यालयात पार पडली विदर्भ राज्य समन्वय समितीची बैठकचंद्रपूर : विदर्भ विरोधी मानसिकतेने आजवर विदर्भाचे केवळ शोषणच झाले असून रस्ते, सिंचन, नोकऱ्या आदींचा अनुशेष सारखा वाढतच गेला. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास आता शक्य नसल्यामुळे आता शांततामय व वैधानिक मार्गाने आम्ही विदर्भ राज्याचा लढा उभारू, असे प्रतिपादन विदर्भ राज्य समन्वय समिती तथा जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले आहे. स्थानिक जनता महाविद्यालयात शुक्रवारी विदर्भ राज्य समन्वय समितीचे वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, जनमंचचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. शरद पाटील, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रकाश इटनकर, उमाकांत धांडे, अ‍ॅड. मनोहर रडके, अमिताभ पावडे, रामभाऊ आखरे, किशोर गुल्हाने, नरेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.अ‍ॅड. किलोर पुढे म्हणाले, विदर्भात १७ हजार मेगावॅट वीज निर्मिती होते. त्यापैकी केवळ दोन हजार मेगावॅटच येथे वापरली जाते. १५ हजार मेगावॅट वीज उर्वरित महाराष्ट्र वापरतो. इथल्या विजेच्या बळावर तिकडे उद्योग उभे होतात. सिंचनासाठी विद्युत पंप चालविले जातात. मात्र विदर्भात लोडशेडिंगच्या नावाने सिंचनाकरिता धड आठ तासही विद्युत पुरवठा होत नाही. वीज उत्पादन करताना प्रदूषणाचा सामना करणाऱ्या विदर्भातील जनतेला आणि उर्वरीत महाराष्ट्रील जनतेला मात्र एकाच दराने वीज मिळते. यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी जनजागृती करण्याकरिता शहरापासून गावपातळी पर्यंत संघटनात्मक बांधणी करुन विदर्भातील जनतेपर्यंत आजवर झालेल्या अन्यायाची माहिती पोहोचवू, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रा.शरद पाटील, अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी तर आभार उमाकांत धांडे यांनी मानले. याप्रसंगी प्रभाकर पारखी, हिराचंद बोरकुटे, डॉ.ईश्वर कुरेकर, तिराणिक, बशीरभाई, विजय मालीकर, सुनील वडस्कर, दीपक गोंडे, अमृत शेंडे, अमोल कुचनवार, नारायण डाखरे, लटारी उरकुडे, साधुजी मुसळे, लिलाधर खंगार, सतीश सोयाम, अमित लोनबले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (प्रतिनिधी)